के.बी.एच. हायस्कुल विरगाव येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी.
विरगाव ता.बागलाण येथील म.वि.प्र. संचलित के.बी.एच हायस्कुल व अभिनव बालविकास मंदिर येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रभाकर देवरे, सदस्य लक्ष्मनतात्या देवरे व मुख्याध्यापक आर डी भामरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन केले, यावेळी मुख्याध्यापक भामरे सर यांनी बोलतानां सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची सुरवात करुन दिल्यामुळेच आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया यशाचे शिखर गाठू शकल्याने समाजात स्त्रियांचा गौरव होत असुन यापुढील काळात सावित्रीबाई चे विचार व कार्य तळागाळापर्यत पोहचविण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तसेच सावित्रीबाई फुले यांची वेशभुशा करुन आलेल्या विद्यार्थिनीचें शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक आर. डी भामरे,पर्यवेक्षक एच झेड भामरे, डि ए पवार,एम बी सावकार,पाटील एम आर,श्री बी एस सावळा श्री एस डी गांगुर्डे,सोनवणे एम बी, पाटील पी एल,पाटील एम डी,ठोके पी बी,पाटील एल एन,सोनवणे जे ए ,शेवाळे ए के, देवरे एस व्ही,एस के गोसावी, एस के देवरे,किरण पाटील, सपकाळे एस जे, भामरे जे के,डी एम देवरे,ए डी सोनवणे,सौरभ काकडे,हर्षाली भामरे, धनश्री देवरे,सुवर्णा पवार,धनश्री पवार व सुजाता सोनावणे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदीसह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते..कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी ए पवार सर यांनी केले तर क्रिडाशिक्षक एम बी सावकार यांनी आभार मानले.
Nice
ReplyDelete