Showing posts with label राजमाता जिजाऊ व भारतीय तत्त्वज्ञानी स्वामी विवेकानंद जयंती. Show all posts
Showing posts with label राजमाता जिजाऊ व भारतीय तत्त्वज्ञानी स्वामी विवेकानंद जयंती. Show all posts

Sunday, January 12, 2020

राजमाता जिजाऊ व भारतीय तत्त्वज्ञानी स्वामी विवेकानंद जयंती

 "जिजाऊ" शब्द किंवा नावाचा ध्वनी नसून उतुंग आदर्श मातृत्वाचा निरंतर वाहणारा  निर्झर आहे. या गौरवशाली मातृत्वाच्या अत्युच्च शिखराला जगात तोड नाही. आदर्श ममतेचा,संस्काराचा,शौर्याचा,धैर्याचा, स्वराज्याचा ज्वलंत साक्षात्कार म्हणजे मा जिजाऊ...
  
१२ जानेवारी १५९८ हा दिवस स्वराज्याची नवी पहाट घेवुन उगवला,वैभवशाली यादव कुळातील लखुजी जाधवांच्या घरी म्हाळसाराणीच्या पोटी एका दैदिप्यमान कन्येने सिंधखेडराजा येथे जन्म घेतला. कन्याप्राप्तीचे स्वप्न साकार होण्याच्या या घटनेने आनंदित होवून राजे लखुजी जाधवांनी हत्तीवरुन साखर वाटली. राजघराण्यातील या कन्येला राजकारण,घोडस्वारी,तलवारबाजी,मुसद्देगीरी,युद्धकलेचे धडे घरातुनच गिरवता आले.१६१०  मध्ये शहाजी सोबत जिजाऊंचा विवाह झाला ही स्वराज्य स्थापनेतील महत्वाची घटना.