This blog created in educational purpose. All useful educational content available this blog.This School programmed or any other activities This is a means of saving, so that the problems of the teachers and students can be helpful in every task, and the main purpose is to solve the problems they face. This is not intended to hurt anyone's feelings.
Showing posts with label होली हैं. Show all posts
Showing posts with label होली हैं. Show all posts
Wednesday, March 11, 2020
पर्यावरण पूरक होळी
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 ☘☘☘☘ *होळी* ☘☘☘☘ 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 होलिकोत्सव प्राकृतिक,प्राचीन व वैदिक उत्सव आहे. याबरोबरच आरोग्यदायक, आनंददायक व अल्हाददायक उत्सव आहे.प्राकृतिक उत्सव या दृष्टीने की,या दिवसांत निसर्गतःच सगळीकडेच विविध रंगांची उधळण होत असते.वृक्ष-वेलींना विविधरंगी फुले व नविन पालवी येत असते.जणु काहीं निसर्गच होळी खेळत असतो. *हो.. ली.. म्हणजेच जो हो गया, सो हो गया।* म्हणजेच मनातील पूर्वीचे राग द्वेष दूर करा… *बुरा न मानो होली है।* 👉हा वैदिक उत्सव आहे. लाखो वर्षापूर्वी भगवान राम व त्यांच्या आधी रघु राजा त्यांच्या आधी सुद्धा राजा दिलीप यांच्या राज्यातही होळी साजरी केल्याचे उल्लेख आहेत. 👉पळसाच्या फुलाचा रंग, केसर, चंदन व गुलाबाच्या पाकळ्या चूरून तयार केलेल्या रंगाने राजे हे होळी खेळत. 👉आजकाल रसायनिक रंगांचा वापर होळी खेळण्यासाठी केला जातो. त्याचा तन-मनावर दुष्परिणाम होतो.काळया रंगातील लेड ऑक्साइड किडनीवर दुष्परिणाम करतो. लाल रंगातील कॉपर सल्फेट कॅन्सरला कारणीभूत असतो. जांभळा रंग दमा व अॅलर्जी वाढवतो. सर्वच रासायनिक रंगांमुळे कोणत्या ना कोणत्या आजारांना आमंत्रण मिळते. 👉 उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये पळसाला लाल/केशरी रंगाची फुले लागलेली असतात. वेद शास्त्रामध्ये पळसाच्या फुलाच्या रंगांनी होळी खेळली जात असल्याचे उल्लेख आहेत. पळसाच्या फुलांना रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवल्यास पाण्याला छान केसरी रंग येतो. हा रंग होळी खेळण्यासाठी सर्वात योग्य आहे. याच्यात औषधी गुण आहेत. *आयुर्वेदानुसार पळस कफ,पित्त, त्वचारोग, मूत्रदोष व रक्ताचे विकार नाहीसे करतो तसेच वाढणाऱ्या सूर्याच्या दाहा पासून संरक्षण देतो, रक्तसंचार नियमित करतो व मांस पेशींना बळ देतो तसेच मानसिक शक्ती व कामेच्छा वाढवतो.* 👉या काळामध्ये हलके व कमी मिठाचे भोजन घ्यावे व गुढीपाडव्याच्या दरम्यान वीस-पंचवीस कडुलिंबाची पाने हिंग, मिरी, साखर व ओव्या बरोबर रोज सकाळी चावून खावी. याने निरोगी राहण्याची खात्री मिळते. *आशा करू या की सर्वजण अशीच पर्यावरण पूरक व आरोग्यदायी होळी साजरी करतील. सर्वांना होळीच्या खूप खूप बहुरंगी शुभेच्छा !!!* 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 🍁🍁🍁🍁🍁
Subscribe to:
Posts (Atom)