This blog created in educational purpose. All useful educational content available this blog.This School programmed or any other activities This is a means of saving, so that the problems of the teachers and students can be helpful in every task, and the main purpose is to solve the problems they face. This is not intended to hurt anyone's feelings.
Wednesday, April 08, 2020
हनुमान जयंती
🕉🕉 *हनुमान जी व आयुर्वेद* 🕉🕉 _*हनुमान जन्मोत्सव निमित्त शुभेच्छा !!*_ 👉हनुमानजी पवनपुत्र म्हणजेच वायूचे पुत्र असून हनुमंतावर वायू महाभूताचा प्रभाव आहे.आयुर्वेदात पंचमहाभूतांपैकी वायूला खूप महत्त्व असून त्याचे प्रचंड असे सामर्थ्य आहे.या वायु तत्वा मुळेच शरीरातील सर्व क्रिया घडत असतात.परंतु शरीराला उपकारक ठरण्यासाठी वायुला साम्यावस्थेत ठेवावे लागते. _*"नास्ति तैलात परम् किंचिदौषधम् मारुतापहं।"*_ म्हणजेच वातावर नियंत्रण ठेवण्यासाठी तेल हे श्रेष्ठ औषध आहे.आयुर्वेदात यासाठीच _*नियमित तेलाचा अभ्यंग (मालिश)*_ करायला सांगितले आहे. यामुळे शरीर बलवान/वज्रवत बनते.कदाचित यामुळेच तर नाही दर शनिवारी आपण मारुतीला तेल वाहत असतो ? 👉हनुमानजी माता सीतेच्या शोधात लंकेला जात असताना त्यांचा निथळलेला घाम समुद्रातील मगरीने प्राशन केला व त्यापासून जन्माला आलेल्या हनुमंताच्या पुत्राचे नाव _*मकरध्वज*_ असे होते. याने अहिरावण व महिरावण या राक्षसांना पराभुत केले होते. _*आयुर्वेदात मकरध्वज*_ नावाचे औषध _*रसशास्त्रात*_ सांगितले असून वैवाहिक सौख्य (पौरुष्य) साठी हे बेजोड औषध आहे.हनुमंताच्या पौरुषत्वाचे वर्णनच कदाचित या कथेतून मांडले आहे. 👉राम रावणाच्या युद्धाच्या वेळी मेघनाद च्या अस्त्राने लक्ष्मणजी मूर्च्छित पडले असताना _*सुषेन*_ वैद्यांना हनुमानजींनी लंकेहून आणले होते. _*संजीवनी बुटी*_ च्या शोधात हनुमानजी गेले असता सर्वच वनस्पती चमकतांना दिसल्यामुळे ते पर्वतच उचलून आणतात.याविषयी असा उल्लेख आहे की,राक्षसांच्या मायावी शक्तीमुळे(संभ्रम निर्माण करण्यासाठी) सर्व वनस्पती चमकत होत्या,परंतु काही जाणकार वैद्यांमध्ये अशी मान्यता आहे की _*हनुमानजीं च्या दृष्टीत सर्वच वनस्पती या संजीवनी असल्यामुळे त्यांना चमकताना दिसत होत्या.*_ असे म्हटलेच आहे की- _*जगत् एवम् औषधं।*_ म्हणजेच या सृष्टीतील सर्वच वनस्पती औषधी आहेत.मात्र असेही म्हटले आहे की _*योजकस्तत्र दुर्लभः।*_ म्हणजेच त्या वनस्पतीची संजीवनी सारखी योजना करू शकणारे(वैद्य) मात्र दुर्लभ आहेत. 👉हनुमान जयंती/रामनवमीला _*सुंठवडा*_ प्रसाद म्हणून वाटला जातो.यात _*सुंठ,साखर व खोबरे*_ असते.यादरम्यान वसंत ऋतू असल्याने सुंठ कफविकारासाठी व वातनाशक म्हणून _*कंबरदुखी, आमवात, संधीवात*_ कमी करण्यासाठी उपयुक्त असते.सुंठ वात,कफ कमी करतेच त्या बरोबर पचन सुधारते व पौरुष शक्ती ही वाढवते. *डॉ.शशिकांत कापडणीस* *(आयुर्वेदाचार्य)*
Thursday, April 02, 2020
क्रिकेट मधील डक वर्थ लुईस या नियम सर्वाना परिचित आहे जाणून घेऊ त्याविषयी....
निधन
लुईस:-
••••••••••••••••••••••••••••••••••••••••
● आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटला प्रसिद्ध डकवर्थ-लुईस नियम देणाऱ्यांपैकी गणिततज्ज्ञ टोनी लुईस यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले. क्रिकेटला डकवर्थ-लुईस-स्टर्न (DLS) पद्धत देणाऱ्या समितीचे ते सदस्य होते. मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यांमध्ये डकवर्थ-लुईस पद्धत वापरली जाते.
● सिडनी येथे झालेल्या १९९२ वर्ल्ड कपच्या उपांत्य सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यानंतर DLS सूत्र तयार करण्यात आले. इंग्लंडला पराभूत करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला १३ चेंडूंत २२ धावांची आवश्यकता होती. पावसाच्या व्यत्ययानंतर एका चेंडूवर २१ धावा करणे अशक्य होते. त्यानंतर काही काळातच हे सूत्र वापरण्यात आले.
● टोनी यांनी सहकारी गणिततज्ज्ञ फ्रँक डकवर्थ यांच्यासमवेत डकवर्थ-लुईस पद्धतीचा ११९७ मध्ये शोध लावला. ICC ने १९९९ मध्ये अधिकृतपणे स्वीकारला. २०१४ मध्ये डकवर्थ-लुईस-स्टर्न सूत्रानुसार या नियमाचं नाव बदलण्यात आलं. मर्यादित षटकांच्या सामन्यात पाऊस पडला तर या पद्धतीचा वापर केला जातो.
● DLS नियमावर बर्याचदा टीका करण्यात आली. ऑस्ट्रेलियन आकडेवारीतज्ज्ञ स्टीव्हन स्टर्न यांनी २०१४ मध्ये ‘स्कोअरिंग रेट’च्या आधारावर नियमात सुधारणा केली. २०१४ मध्ये नाव बदलल्यानंतरही गणिताचे हे सूत्र जगभरात पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यांमध्ये वापरले गेले.
Subscribe to:
Posts (Atom)