निधन
लुईस:-
••••••••••••••••••••••••••••••••••••••••
● आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटला प्रसिद्ध डकवर्थ-लुईस नियम देणाऱ्यांपैकी गणिततज्ज्ञ टोनी लुईस यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले. क्रिकेटला डकवर्थ-लुईस-स्टर्न (DLS) पद्धत देणाऱ्या समितीचे ते सदस्य होते. मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यांमध्ये डकवर्थ-लुईस पद्धत वापरली जाते.
● सिडनी येथे झालेल्या १९९२ वर्ल्ड कपच्या उपांत्य सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यानंतर DLS सूत्र तयार करण्यात आले. इंग्लंडला पराभूत करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला १३ चेंडूंत २२ धावांची आवश्यकता होती. पावसाच्या व्यत्ययानंतर एका चेंडूवर २१ धावा करणे अशक्य होते. त्यानंतर काही काळातच हे सूत्र वापरण्यात आले.
● टोनी यांनी सहकारी गणिततज्ज्ञ फ्रँक डकवर्थ यांच्यासमवेत डकवर्थ-लुईस पद्धतीचा ११९७ मध्ये शोध लावला. ICC ने १९९९ मध्ये अधिकृतपणे स्वीकारला. २०१४ मध्ये डकवर्थ-लुईस-स्टर्न सूत्रानुसार या नियमाचं नाव बदलण्यात आलं. मर्यादित षटकांच्या सामन्यात पाऊस पडला तर या पद्धतीचा वापर केला जातो.
● DLS नियमावर बर्याचदा टीका करण्यात आली. ऑस्ट्रेलियन आकडेवारीतज्ज्ञ स्टीव्हन स्टर्न यांनी २०१४ मध्ये ‘स्कोअरिंग रेट’च्या आधारावर नियमात सुधारणा केली. २०१४ मध्ये नाव बदलल्यानंतरही गणिताचे हे सूत्र जगभरात पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यांमध्ये वापरले गेले.
No comments:
Post a Comment
नमस्कार मी सौरभ काकडे Blog creator. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला आपण comment नक्की करा काही सूचना देखील सांगू शकता. आपल्याला ब्लॉग आवडला तर ह्या ब्लॉग बद्दल आपल्या जवळच्या व्यक्तींना जरूर सांगा.
धन्यवाद