Saturday, January 11, 2020

माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जी पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम

    विरगाव ता.बागलाण येथील म.वि.प्र. संचलित के.बी.एच हायस्कुल व अभिनव बालविकास मंदिर येथे     माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजी  यांची पुण्यतिथी  साजरी करण्यात आली.
          याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रभाकर देवरे व मुख्याध्यापक आर डी भामरे सर  यांनी माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजी  यांच्या प्रतिमेचे पुजन केले, यावेळी मुख्याध्यापक भामरे सर यांनी बोलतानां शास्त्रीजी यांच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली. साधी राहणी उच्च विचारसरणी मूर्ती लहान कीर्ती महान हे त्यांचे गुणवैशिष्ट्ये होते. त्यांनी त्यांच्या पदाचा उपयोग आपल्या कुटुंबासाठी केला नाही. हे देखील त्यांनी नमूद केले.
        यावेळी मुख्याध्यापक आर. डी भामरे,पर्यवेक्षक एच झेड भामरे, डि ए पवार,एम बी सावकार,पाटील एम आर,श्री बी एस सावळा श्री एस डी गांगुर्डे,सोनवणे एम बी, पाटील पी एल,पाटील एम डी,ठोके पी बी,पाटील एल एन,सोनवणे जे ए ,शेवाळे ए के, देवरे एस व्ही,एस के गोसावी, एस के देवरे,किरण पाटील, सपकाळे एस जे, भामरे जे के,डी एम देवरे,ए डी सोनवणे,सौरभ काकडे,हर्षाली भामरे, धनश्री देवरे,सुवर्णा पवार,धनश्री पवार व सुजाता सोनावणे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदीसह मोठ्या संख्येने विद्यार्थी  उपस्थित होते..कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती.सपकाळे एस जे   यांनी केले तर  आदरणीय शिक्षक श्री. डी ए पवार सर यांनी आभार मानले.




दप्तर मुक्त शाळा उपक्रम

https://drive.google.com/drive/u/1/folders/1YjfqfWa7oA-oVwjKyfA6C6Ziljvh6QK3                                                 दप्तर मुक्त शाळा उपक्रम
                                              दि. ११ जानेवारी २०२०     
 आजचा  उपक्रम :      क्रिकेट सामना 
5 overs 
2 Matches 
4 Teams 
 Commentary हिंदी
आणि मस्त थंडी रंगतदार सामना !उत्तुंग षटकार!!
मा.प्रभाकर भाऊ देवरे यांच्या अध्यक्षतेखाली सामना पार पडला. कोच आदरणीय श्री.Sport शिक्षक   सावकार सर यांच्या मार्गदर्शनाने select केलेल्या teams ने रोमहर्षक खेळ सादर केला.
LIVE सामना बघा LIVE या नावावर क्लिक करा.
सामन्यातील  Photo

विजयी संघाला बक्षिस देताना अध्यक्ष मा.श्री .प्रभाकर भाऊ देवरे आदरणीय मा.मुख्या. श्री.भामरे R.D पर्यवेक्षक श्री.भामरे H.Z श्रीमती सपकाळे madam sport teacher सावकार सर  व   श्री.पवार D.A   सर
 


आध्यात्मिक विचार

                                                          आध्यात्मिक विचार
पुष्प १ ले
                                                       🌸श्रीराम जयराम जय जयराम!                                             🌼जय सद्गुरु!!🙏
                                                           🌷 चिंतन : ११.१.२०२०
             🔥🔥🔥
🍂प्रत्येक जीवात्मा जन्माला येताना ठराविक श्वास घेऊनच जन्माला येत असतो. ते श्वास संपले कि लगेचच सध्याचा देह त्याग करून निघून जात असतो. आपले नातेवाईक, परिचित, मित्र यांचे  अचानक झालेले मृत्यू आपल्याला चटका लावून जातात तर काही जण वर्षानुवर्षे अंथरुणाला खिळून असतात. नकळतपणे आपण सुद्धा त्यांची यातून सुटका झाली तर बरे असा विचार करत असतो.  ती व्यक्ती आणि त्यांची सेवा करणाऱ्या व्यक्ती यांचे एक कार्मिक कनेक्शन असते. ते आधीच्या जन्माचे कर्म या जन्मी त्या विशिष्ट वेळी फळाला आलेले असते. म्हणून त्या व्यक्तीची जमेल तेवढी सेवा करून या कर्म बंधनातून आपली सुटका करून घेणेच योग्य असते. गतजन्मात तुम्ही ज्या जीवाला कळत नकळत त्रास दिलेला असेल तर त्या जीवाचे शिव्या शाप कोणत्या ना कोणत्या जन्मात भोगावे लागतातच. आपल्याला सध्या होणार त्रास हा का होत आहे हे साधनेची विशिष्ट पातळी गाठलेली अध्यात्मिक प्रवृत्ती असलेली व्यक्ती सांगू शकते. आपले आई वडील,भाऊ बहीण, बायको नवरा ,मुले यांच्याशी जो संबंध येत असतो त्याचा संबंध हा पूर्वजन्मांशी असतो. यातील प्रत्येक व्यक्तीचा आपल्याला हिशेब चुकवायचा असतो, मग तो चांगल्या किंवा वाईट कर्मांचा सुद्धा असू शकतो. त्यामुळे आत्ताचा जो जन्म मिळाला आहे तो या सर्वांचे हिशेब चुकवण्यासाठी मिळाला आहे. तो चुकवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करावा आणि आपल्या कर्मबंधनातून मुक्त व्हावे.🌹🙏     🔥🔥🔥
जय जय श्रीराम!! जय जय श्रीराम!!                                                    
                                                                       लेखन: मा.श्री.भामरे सर                                                                             मुख्याध्यापक             

Wednesday, January 08, 2020

मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी वर्षभरातील नवोपक्रम

                       मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी वर्षभरातील  नवोपक्रम 
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन मा.मुख्याध्यापक व शिक्षक वृंद 

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन मा.मुख्याध्यापक हस्ते प्रतिमा पूजन  व शिक्षक वृंद 

स्नेहसंमेलन

स्नेहसंमेलन

स्नेहसंमेलन

स्नेहसंमेलन

स्नेहसंमेलन


दप्तर मुक्र्त शाळा वही खेळ

दप्तर मुक्र्त शाळा वही खेळ

क्रांतिसूर्य ज्योतिबा फुलेविद्यार्थ्याच्या हस्ते पूजन

चला खेळूया

बालगोपाल परिपाठ

परिपाठ

वाढदिवस अभिष्टचिंतन


दही हंडी गोपाळकाला उत्सव


राधा किशन कान्हा


भाषण सावित्रीबाई फुले यांच्या विषयी



प्रतिज्ञा

भारतीय संविधान

सावित्रीबाई फुले जयंती निमित्त विनम्र अभिवादन

के.बि.एच हायस्कूल मा.मुख्याध्यापक श्री. भामरे आर.डी सर , पर्यवेक्षक मा.श्री. भामरे एच.झेड व शिक्षकवृंद

नवोपक्रम व मुलांचा सर्वांगीण विकास

                                                     मुलांचा सर्वांगीण विकास
मुलांच्या सर्वांगीण विकासात  शाळा महत्वपूर्ण भूमिका बजावत असते. त्यांना योग्य ते संस्कार करणे, अभ्यासाची गोडी लावणे, विद्यार्थी हा भावी जीवनात देशाचा नागरिक होणार आहे तो एक चांगला व्यक्ती देशाविषयी अभिमान बाळगणारा असला पाहिजे यासाठी त्याला शिक्षक संस्कार नावाचे बाळकडू पाजत असतात. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हा विद्यार्थ्याच्या जीवनातील महत्वपूर्ण टप्पा असतो. याच वयोगटात त्याच्यावर चागले संस्कार झाले तर तो एक आदर्श नागरिक किवा महान व्यक्ती झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे हि जबाबदारी पालकांइतकीच शिक्षकाची देखील असते. त्याच्या वर योग्य संस्कार झाले तर तो चागल्या मित्रांच्या संगतीत तसेच चागल्या लोकांच्या संपर्कात राहील हेही तितकच खर मुलांमध्ये
 १० मूल्ये हि या शैक्षणिक आयुष्यात रुजलीच गेले पाहिजे.  

 १० मूल्ये खालीलप्रमाणे आहेत 

स्त्रीचा आदर
सार्वजनिक स्वच्छता
सहनशीलता
४ नीटनेटकेपणा
क्षमाशीलता
प्रामाणिकपणा
७ गुरु माता पित्यांचा आदर
८ राष्ट्रीय संपत्ती जपणूक (बस, कार्यालये, सार्वजनिक ठिकाणे इ).
९ अहिंसा
१० आपुलकी
      हे इतर मुल्ये आहेत 

मुलांचा सर्वांगीण विकास  येथे क्लिक करा मुलांच्या सर्वांगीण विकासावर  आधारित पुस्तक दिलीपराज प्रकाशन डॉ. किशोरी पै यांचे अप्रतिम पुस्तक आहे.

मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रमशील शाळा

या वर क्लिक करा 

 

 

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

    शुक्रवार  दिनांक ३ जानेवारी २०२०                                           
                 क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती  या नावावर क्लिक करा आणि जाणून घ्या सावित्रीबाई फुले यांचा जीवनप्रवास 
आजही शिकविते सावित्री

Saturday, January 04, 2020

म.वि.प्र मॅरेथॉन ५ जानेवारी २०२०



क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम

 के.बी.एच. हायस्कुल विरगाव येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी.

    विरगाव ता.बागलाण येथील म.वि.प्र. संचलित के.बी.एच हायस्कुल व अभिनव बालविकास मंदिर येथे     क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले  यांची जयंती साजरी करण्यात आली.त्याप्रसंगी विविध कार्यक्रम घेण्यात आले।  त्याची क्षणचित्रे



kbh हायस्कूल या शाळेतील दप्तर विना शाळा उपक्रम

                                                           दप्तर मुक्त शाळा 
बागलाण तालुक्यातील अवघ्या १० किमी अंतरावर वसलेले एक गाव. आणि या गावातीलच मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेतील कर्मवीर भाऊसाहेब हिरे हायस्कूल ही अग्रगण्य शाळा मा.श्री.भामरे आर.डी यांच्या मार्गदर्शनाने विविध उपक्रम राबवले जातात. येथील शिक्षकही  तळमळीने ते उपक्रम पूर्णत्वास नेतात.
त्यातीलच एक उपक्रम म्हणजे दर शनिवारी असलेला दप्तर विना शाळा बघू यात त्याचे काही क्षणचित्रे बघण्यासाठी खालील दप्तर आणि शाळा या लिंक वर क्लिक करा. एक नवीन Page सुरु होईल तेथून तुम्ही बघू शकता . 


  दप्तर   विना   शाळा 

Thursday, December 26, 2019



⚛के.बि.एच.हायस्कूल, विरगाव या शैक्षणिक ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ⚛


Wednesday, December 25, 2019

सूर्यग्रहण माहिती

                          सूर्यग्रहण
                         
खग्रास सूर्यग्रहण
जेव्हा सूर्य पूर्णपणे चंद्राच्या मागे लपला जातो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात.
खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेस, सूर्य चंद्रामागे गेल्यानंतर चंद्राच्या चारही बाजूंनी सूर्याची किरणे दिसतात. यांचा आकार वर्तुळाकार असतो. त्यामुळे या किरणांना तेजोवलय (Corona) असे म्हणतात.

खंडग्रास सूर्यग्रहण

जेव्हा सूर्याचा काही भागच चंद्राच्या मागे जातो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात.
कंकणाकृती सूर्यग्रहण
जेव्हा चंद्र पृथ्वीपासून त्याच्या सर्वाधिक लांब अंतरावर राहून सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येऊन सूर्याच्या प्रकाशाला झाकून टाकतो तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण बघायला मिळते. ह्या सूर्यग्रहणात चंद्र जास्त अंतरावर असल्यामुळे तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही. अशावेळी सूर्याची वर्तुळाकार कडी चंद्राच्या पाठीमागे दिसते.


दिनांक २६/१२/२०१९ रोजी गुरुवारी  कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून पाहता येणार
शके १९४१ रोजी गुरुवारी २६ डिसेंबर २०१९... मार्गशीर्ष कृष्ण आमवस्या ग्रहण काल माहिती
स्पर्श सकाळी:- ०८:०४ मी ग्रहण आरंभ ग्रहण  सकाळी ०९:२२ मी ग्रहण ग्रहण
मोक्ष  सकाळी १०:५५ मी ग्रहण समाप्त पर्व ०२:५१ मी ग्रहण वेध काल माहिती शके १९४१ रोजी बुधवारी
२५ डिसेंबर २०१९... मार्गशीर्ष कृष्ण आमवस्या २५ डिसेंबरच्या सूर्यास्तापासून आरंभ
ग्रहाणाचा वेध   हे ग्रहण दिवसाच्या पहिल्या प्रहरात असल्याने बुधवारी २५ डिसेंबरच्या सूर्यास्तापासून २६ डिसेंबर ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळावेत. बाल,वृध्द, आजारी,अशा व्यक्तींनी आणि गर्भवती स्त्रियांनी रात्री १२ पासून ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळावेत. वेदामध्ये भोजन करू नये. स्नान,जप,नित्यकर्म, देवपूजा,श्राद्ध कर्म ही करता येतात. वेधकाळात आवश्यक असे पाणी पिणे, मलमूत्रोत्सर्ग,झोप,इ. कर्मे करता येतात. ग्रहणपर्वकाळात म्हणजेच सकाळी ०८|०४ ते १०|५५ या कालावधीत पाणी पिणे, मलमूत्रोत्सर्ग, झोप इत्यादी कर्मे करणे करू नये.
ग्रहण दिसणारे प्रदेश  भारतासह संपूर्ण आशियाखंड आफ्रिकाखंडातील इथिओपिया व केनिया आणि ऑस्ट्रेलियाचा उत्तरेकडील प्रदेश या प्रदेशात ग्रहण दिसणार आहे.
केरळ,तामिळनाडू इत्यादी प्रदेशात कंकणाकृति अवस्था पहावयास मिळेल उर्वरित संपूर्ण भारतामध्ये हे ग्रहण खंडग्रास दिसेल. पुण्यकाल / पर्वकाल ग्रहणस्पर्शापासून मोक्षापर्यंतचा काळ पुण्यकाल मानावा. खगोलीय घटनांमध्ये दुर्मीळ समजले जाणारे कंकणाकृती सूर्यग्रहण एक महिन्याने गुरुवार, २६ डिसेंबर रोजी भारतातून दिसणार आहे. यापूर्वी, १५ जानेवारी २०१० रोजी नऊ वर्षांपूर्वी झालेल्या सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती भारतातून दिसली होती. २६ डिसेंबरला होणाऱ्या सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती दक्षिण भारतातील कर्नाटक, केरळ तामिळनाडू येथील काही, भागांतून दिसेल. उर्वरित भारतातून हे सूर्यग्रहण खंडग्रास स्थितीत दिसेल, असे खगोल अभ्यासक, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. सोमण म्हणाले की, खग्रास सूर्यग्रहणात चंद्रबिंब संपूर्ण सूर्यबिंबाला झाकून टाकते.परंतु जर त्या वेळी चंद्र पृथ्वीपासून दूर असेल तर चंद्रबिंब लहान दिसत असल्याने सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकून टाकू शकत नाही. अशावेळी सूर्याची वर्तुळाकार कडा आपल्याला दिसते, त्यालाच 'कंकणाकृती सूर्यग्रहण' म्हणतात. अक्षरश: 'फायर रिंग'चे दर्शन आपल्याला होते. सूर्यग्रहण साध्या डोळ्यांनी न पाहता चष्म्याचा वापर करावा, असे ते म्हणाले. मुंबई येथे सकाळी ८.०४ ते १०.५५ या वेळेत तर, पुणे येथून ८.०५ ते १०.५८ या वेळेत हे ग्रहण दिसेल. यानंतर पुढच्या वर्षी २१ जून २०२० रोजी होणाऱ्या सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती राजस्थान, पंजाब, हरयाणा आणि उत्तराखंडमधील काही प्रदेशातून दिसणार आहे. खंडग्रास स्थितीची वेळ प्रत्येक ठिकाणी वेगळी असणार आहे. गुरुवार, २६ डिसेंबर रोजी होणाऱ्या सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या तीन राज्यांतील काही भागांतून दिसणार आहे. यामध्ये कोइम्बतूर, धरमपूरम, दिंडीगुल, एरोडे, कान्हनगड, कन्नूर, करूर, कोझिकोडे, मदेकेरी, मंगलोर, मंजेरी, उटी, फाल्लकड, पायन्नूर, पोलची, पुडुकोटल, लिरूचीपल्ली, तिरुपूर इत्यादी ठिकाणे आहेत. साधारणत: दोन ते तीन मिनिटे खग्रास स्थिती तेथून दिसणार आहे. उर्वरित भारतातून या सूर्यग्रहणाची खंडग्रास स्थिती वेगवेगळ्या वेळी दिसणार आहे.

वेधातील नियम काय आहे?

  • 1.       भोजन करू नये, ग्रहण स्पर्श ते मोक्ष  काळात मल- मूत्र विसर्जन,
  • 2.       भोजन, अभ्यंगस्नान,झोप, काम
  • 3.       विषयक सेवन शक्यतो टाळावे.
  • 4.       नदीत स्नान शुभ मानले जाते. यथा
  • 5.       शक्ती स्नान कुठच्याही नदीत गंगा
  • 6.       समजून करावी.मोक्षा नंतर च स्नान करावे.
  • 7.       ग्रहण कालावधीत काय करावे?
  • 8.   स्नान,दान,होम,तर्पण,श्राद्ध,मंत्र पुर्शचरण करावे .,ग्रहण लागण्याच्या सुरूवातीलाच दर्भ व तुळशीपत्र वापरले तर दोष लागणार नाहीत.

ग्रहणाबाबतीत बरेच गैरसमजुती आहेत.
  1. ग्रहण लागताच वेध लागते.त्यामुळे काहीच करु नये. हे खरेही आहे म्हणून काय करावे काय करु नये हे मी सांगण्याचा प्रयत्न करतो.
  2.   ग्रहणात स्नान करुन पुजा,पाठ करावेत,मंत्र जप करावा.
  3.   ग्रहण काळात झोपू नये
  4.   घराची साफ सफाई करू नये.
  5. गर्भवती स्त्रियांनी  देवाची उपासना करावी.जप करावा.घरातून बाहेर जाऊ नये.व ग्रहण काळी काहीही खाऊ नये.नाहीतर बाळाला शारीरिक त्रास होतो.
  6. ग्रहण संपल्यानंतर घरात गंगाजल शिंपडावे त्यानंतर काहीतरी गोड बनवून देवाला नैवेद्य दाखवावा व नंतर जेवण करावे.
  7.  ग्रहणकाळात कोणाशीही भांडण करु नका.शांत रहा,ध्यान करा,गप्प बसा
  8. ग्रहणकाळात झोपू नका नाहीतर रोग पकडतो.
  9.  ग्रहणकाळात लघुशंका, लघवी करु नये,घरात दरिद्रता येते.सावध रहा.
  10. ग्रहणकाळात जो शौचास जातो त्यास पोटाचे विकार होतात.
  11.  ग्रहणकाळात संभोग करु नये.नाहीतर डुक्कराच्या योनीत जन्म येतो.
  12.  ग्रहणकाळात चोरी, फसवणे,करु नका नाहीतर सर्पयोनीत जन्म घ्यावा लागेल.
  13.  ग्रहणकाळात जीवजंतू व कोणाची हत्या करु नका.नाहीतर अनेक योनींत भटकावे लागेल.
  14.  ग्रहणकाळात भोजन,माॅलीश करु नका,नाहीतर अनेक रोग शरीराला जखडतील.
  15.  ग्रहणकाळात मौन पाळा,जप करा,ध्यान करा.याचे फल लाख पटीने आहे.
  16.  ग्रहणकाळात सर्व कामे सोडून मौन व जप करा हे फार महत्त्वाचे आहे.
  17. सत्य ग्रहणशक्ती अगोदर खावून-पिऊन घ्यावे पण बाथरूम ला जावे लागेल असे घेऊ नये.
  18.  नशापाणी,घाणेरडे वागणे करु नये.स्वैयपाक करु नये.धुने धुवू नये.पाणी भरु नये,
  19.  भगवान  ग्रहणकाळात भ्रूमध्यामध्ये ध्यान करावे.मुले बुद्धिमान होतात.

ग्रहणकाळात काय करावे काय करु नये ही माहिती मी दिली आहे. ही लक्षात ठेवा. हे सर्व शास्त्र परिहार आहे. यातून कोणतीही सूट नाही.
ग्रहण होते म्हणजे नेमके काय होते?
सूर्य या तार्‍याभोवती फिरणार्‍या पृथ्वी या ग्रहाभोवती तिचा चंद्र हा उपग्रहही फिरत असतो. या सर्वाच्या भ्रमण पातळ्या वेगवेगळ्या आहेत. फिरता फिरता सूर्य व पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र येऊन त्याची सावली पृथ्वीवर पडते. ती ज्या भागात पडते तेथून तेवढा काळ चंद्रबिंबामुळे सूर्यबिंब झाकल्या सारखे दिसते. ते सूर्यबिंब पूर्णपणे दिसेनासे झाले तर खग्रास चंद्रग्रहण  आणि सूर्यबिंब अर्धवट झाकले गेले तर ते खंडग्रास चंद्रग्रहण होय. अशी स्थिती येणे फक्त अमावास्येलाच शक्य असते. सूर्य व चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी आली, तर तिची सावली चंद्रावर पडते व चंद्राचे तेज कमी होते. त्यावेळी चंद्र तांबूस-भुरकट रंगाचा दिसतो. पृथ्वीच्या सावलीत पूर्ण चंद्र आला तर ते खग्रास चंद्रग्रहण घडते. चंद्राच्या काही भागांवर पृथ्वीछाया पडली तर ते खंडग्रास चंद्रग्रहण असते. असा चंद्रग्रहण योग फक्त पौर्णिमेलाच येऊ शकतो.

राहू व केतू म्हणजे काय?
पृथ्वीकक्षेचे प्रतल ( पातळी ) व चंद्रकक्षेचे प्रतल हे वेगवेगळ्या प्रतलात आहेत. त्या प्रतलांच्या छेदन बिंदूंना राहू व केतू म्हणतात. चंद्रकक्षेचे प्रतल पृथ्वीकक्षेच्या प्रतलात ज्या बिंदूपाशी उत्तरेकडे जाते तो पातबिंदू राहू होय. याउलट चंद्रकक्षेचे प्रतल पृथ्वीकक्षेच्या प्रतलात ज्या बिंदूपाशी दक्षिणेस जाते तो बिंदू केतू होय. ज्या अमावास्येला-पौर्णिमेला चंद्र राहू अथवा केतू बिंदूजवळ असेल तेव्हाच ग्रहण घडू शकते. राहू व केतू हे पातबिंदू एकमेकांच्या बरोबर विरुद्ध अंगाला म्हणजे एकमेकांपासून १८० अंशावर असतात.
दर अमावस्या-पौर्णिमेला सूर्य-चंद्र ग्रहण का होत नाहीत?
अमावास्येला पृथ्वीसापेक्ष सूर्य व चंद्र एकाच दिशेला उगवतात. म्हणजेच त्यांच्यातील पूर्व-पश्चिम अंतर सर्वात कमी किंवा शून्य होते. पण भ्रमण कक्षेच्या पातळीतील फरकामुळे त्याचे दक्षिणोत्तर अंतर शिल्लक राहते. ते ज्या वेळा सर्वात कमी किंवा शून्य होते तेव्हाच ग्रहण घडू शकते.
सूर्य व पृथ्वी यांच्या, मध्ये चंद्र आला की सूर्यग्रहण घडते. हे आपण पूर्वी पाहिले आहे. सूर्य व चंद्र पृथ्वीसापेक्ष जरी  पूर्वेलाच किंवा पश्चिमेलाच असेल तर चंद्र सूर्याच्या उत्तरेस किंवा दक्षिणेस असेल, तर चंद्राची सावली पृथ्वीवर पडणारच नाही. म्हणजे सूर्यग्रहण होणार नाही. चंद्राची छाया पृथ्वीवर न पडता ती उत्तर किंवा दक्षिणेकडून जाईल. अशावेळी पृथ्वीवरून सूर्यग्रहण दिसणारच नाही. अशीच घटना पौर्णिमेला चंद्राबाबत घडते. पृथ्वीची सावली चंद्रावर पडली तरच चंद्रग्रहण होईल. पण त्यासाठी त्यांचे पूर्व पश्चिम व दक्षिण उत्तर अंतर शून्य किंवा कमीत कमी व्हायला हवे.