Saturday, January 11, 2020

आध्यात्मिक विचार

                                                          आध्यात्मिक विचार
पुष्प १ ले
                                                       🌸श्रीराम जयराम जय जयराम!                                             🌼जय सद्गुरु!!🙏
                                                           🌷 चिंतन : ११.१.२०२०
             🔥🔥🔥
🍂प्रत्येक जीवात्मा जन्माला येताना ठराविक श्वास घेऊनच जन्माला येत असतो. ते श्वास संपले कि लगेचच सध्याचा देह त्याग करून निघून जात असतो. आपले नातेवाईक, परिचित, मित्र यांचे  अचानक झालेले मृत्यू आपल्याला चटका लावून जातात तर काही जण वर्षानुवर्षे अंथरुणाला खिळून असतात. नकळतपणे आपण सुद्धा त्यांची यातून सुटका झाली तर बरे असा विचार करत असतो.  ती व्यक्ती आणि त्यांची सेवा करणाऱ्या व्यक्ती यांचे एक कार्मिक कनेक्शन असते. ते आधीच्या जन्माचे कर्म या जन्मी त्या विशिष्ट वेळी फळाला आलेले असते. म्हणून त्या व्यक्तीची जमेल तेवढी सेवा करून या कर्म बंधनातून आपली सुटका करून घेणेच योग्य असते. गतजन्मात तुम्ही ज्या जीवाला कळत नकळत त्रास दिलेला असेल तर त्या जीवाचे शिव्या शाप कोणत्या ना कोणत्या जन्मात भोगावे लागतातच. आपल्याला सध्या होणार त्रास हा का होत आहे हे साधनेची विशिष्ट पातळी गाठलेली अध्यात्मिक प्रवृत्ती असलेली व्यक्ती सांगू शकते. आपले आई वडील,भाऊ बहीण, बायको नवरा ,मुले यांच्याशी जो संबंध येत असतो त्याचा संबंध हा पूर्वजन्मांशी असतो. यातील प्रत्येक व्यक्तीचा आपल्याला हिशेब चुकवायचा असतो, मग तो चांगल्या किंवा वाईट कर्मांचा सुद्धा असू शकतो. त्यामुळे आत्ताचा जो जन्म मिळाला आहे तो या सर्वांचे हिशेब चुकवण्यासाठी मिळाला आहे. तो चुकवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करावा आणि आपल्या कर्मबंधनातून मुक्त व्हावे.🌹🙏     🔥🔥🔥
जय जय श्रीराम!! जय जय श्रीराम!!                                                    
                                                                       लेखन: मा.श्री.भामरे सर                                                                             मुख्याध्यापक             

No comments:

Post a Comment

नमस्कार मी सौरभ काकडे Blog creator. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला आपण comment नक्की करा काही सूचना देखील सांगू शकता. आपल्याला ब्लॉग आवडला तर ह्या ब्लॉग बद्दल आपल्या जवळच्या व्यक्तींना जरूर सांगा.
धन्यवाद