Sunday, March 29, 2020

करोना ला रोखुया

(चला शासनाला मदत करूया आपले कार्य आपण करूया)
          
प्रति,
   सन्माननीय पालक,
      आपल्या मुलांच्या शाळेला सुट्ट्या दिलेल्या आहेत व व पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षाही रद्द करण्यात आलेले आहेत. आपल्या पाल्याची परीक्षेच्या बाबतीत अजिबात चिंता करू नका आपल्या स्वतःची व आपल्या मुलाची  काळजी घ्या .अभ्यासाच्या बाबतीत व परीक्षेच्या बाबतीत अजिबात चिंता करू नका सर्व परीक्षा रद्द झालेल्या आहेत पहिली ते आठवीपर्यंतच्या काही अडचण असल्यास आपण मला (वर्गशिक्षकांना) तात्काळ संपर्क करा. मला माहित आहे आपल्या प्रत्येकाकडे फोन आहे आपण शेतात जरी असाल तरी फोन करून विचारू शकतात. पण आपल्या मुलाला गर्दीच्या ठिकाणी घेऊन जाऊ नका किंवा पाठवू नका.शासनाने का बरं आपल्या पाल्याच्या शाळेला सुट्ट्या दिल्या असतील..? या प्रश्नाचा गांभीर्याने विचार करा.
    आपल्या मुलाला का बर सुट्ट्या दिलेल्या आहेत या बाबींचे कारण जाणून घ्या , सुट्टी ही गंमत म्हणून दिली नाही,परीक्षा या गंमत म्हणून रद्द करण्यात आलेले नाहीत या बाबीचे गांभीर्य लक्षात घ्या. आपल्या राज्यातच नाहीत तर  अनेक राज्यातील शासनाने शाळा महाविद्यालय यांना सुट्ट्या जाहीर केले आहेत .याच बरोबरीला परीक्षाही ही रद्द करण्यात आलेल्या आहेत. कारण... विविध राज्यात जीवघेणा *कोरोना* नावाचा संसर्गजन्य व्हायरस पसरतो आहे त्याला प्रतिबंध म्हणून ही सुट्टी जाहीर केली आहे व परीक्षाही रद्द करण्यात आलेले आहे.कारण लहान मुलं ही लगेच कोणाच्याही संपर्कात येतात,त्यांना स्वच्छतेची जाणीव नसते,चांगलं वाईट समजत नाही म्हणून ही मुले एखाद्या संसर्गजन्य रोगाच्या सहज आहारी जाऊ शकतात, म्हणून घरात मुले राहतील तर ती जास्त लोकांच्या संपर्कात येणार नाहीत,त्यांच्या पालकांचे त्यांच्याकडे लक्ष राहील,सुयोग्य आहार घेतील,तसेच स्वतःच्या स्वच्छ तेकडे लक्ष देतील, संसर्ग होणार नाही व त्यामुळे कोरोना सारख्या आजाराला बळ मिळणार नाही,हा सुट्टी देण्यामागचा व परीक्षा रद्द करण्यामागचा आपल्या प्रशासनाचा चांगला हेतू आहे.
म्हणून पालकहो ..मुलांना सुट्टी लागली म्हणून मामाच्या, किंवा इतर नातेवाईक यांच्या गावाला पाठवू नका, त्यांना पिकनिक किंवा गर्दीच्या ठिकाणी, पर्यटन स्थळे, सहल इत्यादी ठिकाणी पाठवू नका, सुट्टी आहे म्हणून त्यांना बाजार, यात्रा महोत्सव, इत्यादी ठिकाणी पाठवू नका किंवा तुम्ही ही जाऊ नका,आपले घर,शेती,शाळेचा अभ्यास इ मध्ये त्यांचे मन रमवा. काही अडचण असल्यास मला (आपल्या मुलाच्या शिक्षकांना) जरूर फोन करून कळवा. शिक्षकाने सांगितल्याप्रमाणे आपल्या मुलाचा प्रत्येक विषयाचा दररोज सराव घ्या.; प्रश्नोत्तरे, प्रश्नपत्रिका सराव, लेखन,वाचन यांचा सराव घ्या...; आम्ही सांगितलेल्या यूट्यूब चैनल ला विद्यार्थ्यांना भेट द्यायला सांगा यूट्यूब चैनल वर विविध शिक्षक आणि आणि तयार केलेले शैक्षणिक साधने उपलब्ध आहेत त्यांचे मन तिथे अवश्य रमेल.
फोन,वॉट्सअप्प, मेसेज या माध्यमातून आपल्या पाल्याच्या शिक्षकांच्या संपर्कात राहा, आपले सर्व शिक्षक आपणास सुव्यवस्थित मार्गदर्शन करतील,होमवर्क वगैरे देतील,पण मुलांच्या अभ्यासात खंड पडू देऊ नका... आपल्या शंका ,अडचणी नक्की विचारा, मुलांना अनोळखी व्यक्तींच्या, परदेशी पाहुण्यांच्या संपर्कात जाऊ देऊ नका, बाहेरील वस्तू खाऊ देऊ नका, उघड्यावरील वडापाव, आईस्क्रीम, बर्फ गोळा, आईस कांडी, पाणीपुरी,भेळ अशा वस्तूंपासून चार हात दूर ठेवा..
फक्त पुढचा आठवडा आपल्याला जपायचे आहे,आणि या कोरोनावर विजय मिळवायचा आहे.आपण आपल्या गावाचे,शहराचे जागृक नागरिक आहोत हे आपण इतर शहरांना दाखवून देऊ चला तर मग स्वच्छता बाळगूया व करोनाला हद्दपार करूया.
                                                          आपले शिक्षक

No comments:

Post a Comment

नमस्कार मी सौरभ काकडे Blog creator. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला आपण comment नक्की करा काही सूचना देखील सांगू शकता. आपल्याला ब्लॉग आवडला तर ह्या ब्लॉग बद्दल आपल्या जवळच्या व्यक्तींना जरूर सांगा.
धन्यवाद