*नाशिक जिल्ह्यासाठी मोठी बातमी* . मराठा विद्याप्रसारकच्या लॅबमध्ये सव्वा कोटी खर्चाचे नवीन मशीन येणार, ज्यात दिवसाला 500 रिपोर्ट मिळू शकतील. म्हणजेच मालेगाव आणि नाशिकची गरज भागू शकेल.
--
मविप्र लॅबमध्ये येणार दिवसाला ५०० रिपोर्ट देणारे ऑटोमॅटिक मशीन
सरचिटणीस मा.श्रीमती निलिमा पवार यांची माहिती; महिनाभरात मशीन होणार उपलब्ध
हेमंत भोसले | नाशिक
करोना टेस्टचे रिपोर्ट अधिक संख्येने आणि कमी वेळेत मिळण्यासाठी नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्था स्वखर्चाने सुमारे सव्वा कोटी रुपये किंमतीचे ऑटोमॅटिक मशीन आणि त्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करणार असल्याची अतिशय महत्वपूर्ण माहिती संस्थेच्या सरचिटणीस मा. श्रीमती. निलिमा ताई पवार यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना दिली. यामुळे एक दिवसात ५०० रिपोर्ट मिळणे शक्य होणार आहे. या मशिनसाठी संस्थेने निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. पाच आठवड्यात हे मशीन प्राप्त होण्याची शक्यता आहे, असेदेखील निलिमा पवार यांनी स्पष्ट केले.
मविप्रची लॅब असतानाही नाशिकमधील स्वॅब सध्या पुणे आणि धुळे येथील लॅबमध्ये पाठवले जात आहेत. त्यामुळे रिपोर्ट मिळण्यास विलंब होत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मविप्र संस्थेने पुढाकार घेतला असून संस्थेच्या टेस्ट लॅबची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती पवार यांनी दिली. त्या पुढे म्हणाल्या की, सदर मशीनची निर्मिती अमेरिकेत होते. हे मशीन नाशकात येण्यासाठी चार ते पाच आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. मात्र, एकदा ते आल्यास रिपोर्ट वेळेत मिळण्यातील बहुतांश अडथळे दूर होतील. या मशीनमुळे दररोज किमान ५०० रिपोर्ट तरी हातात पडू शकतात. त्यामुळे नाशिक आणि मालेगावाच्या रिपोर्टचा प्रश्न सुटू शकेल.
--
सध्या दररोज दिले जातात २२५ रिपोर्ट-
सध्याच्या काळात दर चार तासाला स्वॅबमधून ४० ते ४५ मॅन्युअल आर. एन. ए. एक्स्ट्रॅक्शन केले जातात. म्हणजे साधारणपणे ७ तासांत ९० आरएनए मिळतात. त्यानंतर आरटीपीसीआर मशीनद्वारे दोन तासांत ९० रिपोर्ट्स मिळतात. यामुळे सुरुवातीच्या काळात १५० रिपोर्ट देण्याचे बंधन होते. परंतु आता रुग्णसंख्या वाढल्याने आम्ही दररोज २२५ रिपोर्ट देत आहोत. त्यासाठी तीन पाळ्यांमध्ये ६० कर्मचारी काम करतात. लॅबसाठी मनुष्यबळ मविप्रचेच आहे. सामग्री मात्र शासन देते. ही सामग्री महिन्याची मिळाली तर विनाअडथळा काम सुरू होईल. मध्यंतरी दोन दिवस काम केवळ सामग्रीअभावी थांबवावे लागले होते. एकदा स्वॅब आम्हाला प्राप्त झाले की ४८ तासांत त्यांचे रिपोर्ट
देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. त्यामुळे आमच्या पातळीवर रिपोर्ट देताना कुठलाही विलंब होत नाही.
७२ पोलीस, सीआरपीएफ जवानांवर उपचार-
मालेगाव येथील पोलीस आणि सीआरपीएफचे ७२ पॉझिटिव्ह कर्मचारी सध्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल आहेत. यापुढील काळात ३०० पोलीस दाखल होऊ शकतील, अशी व्यवस्था आम्ही करुन ठेवली आहे. या पोलिसांच्या जेवणाची व्यवस्था मविप्रकडूनच केली जाते, असेही *मा.निलिमा पवार* यांनी सांगितले.