Friday, January 24, 2020

७१ वा भारतीय प्रजासत्ताक दिवस चिरायू होवो

भारत भूमी जिच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली अशा सर्व वीर पुत्रांना वंदन 

भारत विविधतेत एकता असणारा देश 

अनेक रंग अनेक सण उत्सव अनेक नृत्य  अनेक कला विविध भाषिक लोक कला   


भारत हमको जान से प्यारा है 


भारतीय संस्कृती 


*के.बी.एच.हायस्कूल, विरगाव नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी

*के.बी.एच.हायस्कूल, विरगाव ता.बागलाण जि. नाशिक* 

■■■■■■■■◆◆◆◆◆◆◆■■■■■■■
                  
*नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती*

          *विद्यालयात आज दि.२३ जानेवारी २०२० रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.आर.डी.भामरे  होते त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित मार्गदर्शन केले त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे व आपल्याही हातून चांगले देश कार्य घडो अश्या अपेक्षा व्यक्त केल्या ...!!*

           *यावेळी विद्यालयाचे  मुख्याध्यापक श्री.आर.डी.भामरे,पर्यवेक्षक  श्री.एच.झेड.भामरे , शिक्षक वृंद ,शिक्षकेतर कर्मचारी व  विद्यार्थी उपस्थित होते*.
           *कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इ.९ वी-अ च्या विद्यार्थ्यांनी केले.*
◆◆◆◆◆◆◆●●●●●●●◆◆◆◆◆◆◆◆

स्पर्धा परीक्षेत यश कुमार - खंडाळे निखील इ.१० वी

*के.बी.एच.हायस्कूल, विरगाव ता.बागलाण 

जि. नाशिक*

■■■■■■■■◆◆◆◆◆◆◆■■■■■■■■


          *के.बी.एच.हायस्कूल विरगाव येथील कु.खंडाळे निखिल इ.१० वी या विद्यार्थ्यांने  गांधी रिसर्च फाउंडेशन तर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत नाशिक जिल्ह्यात तिसरा क्रमांक मिळाल्याबद्दल विद्यालय परिवारातर्फे त्याचे पुष्प ...🌹🌹🌹देऊन सत्कार करण्यात आला यावेळी विद्यालयाचे  मुख्याध्यापक श्री.आर.डी.भामरे,पर्यवेक्षक  श्री.एच.झेड.भामरे व शिक्षक वृंद ,विद्यार्थी उपस्थित होते*.


◆◆◆◆◆◆◆●●●●●●●◆◆◆◆◆◆◆◆

Sunday, January 12, 2020

राजमाता जिजाऊ व भारतीय तत्त्वज्ञानी स्वामी विवेकानंद जयंती

 "जिजाऊ" शब्द किंवा नावाचा ध्वनी नसून उतुंग आदर्श मातृत्वाचा निरंतर वाहणारा  निर्झर आहे. या गौरवशाली मातृत्वाच्या अत्युच्च शिखराला जगात तोड नाही. आदर्श ममतेचा,संस्काराचा,शौर्याचा,धैर्याचा, स्वराज्याचा ज्वलंत साक्षात्कार म्हणजे मा जिजाऊ...
  
१२ जानेवारी १५९८ हा दिवस स्वराज्याची नवी पहाट घेवुन उगवला,वैभवशाली यादव कुळातील लखुजी जाधवांच्या घरी म्हाळसाराणीच्या पोटी एका दैदिप्यमान कन्येने सिंधखेडराजा येथे जन्म घेतला. कन्याप्राप्तीचे स्वप्न साकार होण्याच्या या घटनेने आनंदित होवून राजे लखुजी जाधवांनी हत्तीवरुन साखर वाटली. राजघराण्यातील या कन्येला राजकारण,घोडस्वारी,तलवारबाजी,मुसद्देगीरी,युद्धकलेचे धडे घरातुनच गिरवता आले.१६१०  मध्ये शहाजी सोबत जिजाऊंचा विवाह झाला ही स्वराज्य स्थापनेतील महत्वाची घटना.
 






Saturday, January 11, 2020

माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जी पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम

    विरगाव ता.बागलाण येथील म.वि.प्र. संचलित के.बी.एच हायस्कुल व अभिनव बालविकास मंदिर येथे     माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजी  यांची पुण्यतिथी  साजरी करण्यात आली.
          याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रभाकर देवरे व मुख्याध्यापक आर डी भामरे सर  यांनी माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजी  यांच्या प्रतिमेचे पुजन केले, यावेळी मुख्याध्यापक भामरे सर यांनी बोलतानां शास्त्रीजी यांच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली. साधी राहणी उच्च विचारसरणी मूर्ती लहान कीर्ती महान हे त्यांचे गुणवैशिष्ट्ये होते. त्यांनी त्यांच्या पदाचा उपयोग आपल्या कुटुंबासाठी केला नाही. हे देखील त्यांनी नमूद केले.
        यावेळी मुख्याध्यापक आर. डी भामरे,पर्यवेक्षक एच झेड भामरे, डि ए पवार,एम बी सावकार,पाटील एम आर,श्री बी एस सावळा श्री एस डी गांगुर्डे,सोनवणे एम बी, पाटील पी एल,पाटील एम डी,ठोके पी बी,पाटील एल एन,सोनवणे जे ए ,शेवाळे ए के, देवरे एस व्ही,एस के गोसावी, एस के देवरे,किरण पाटील, सपकाळे एस जे, भामरे जे के,डी एम देवरे,ए डी सोनवणे,सौरभ काकडे,हर्षाली भामरे, धनश्री देवरे,सुवर्णा पवार,धनश्री पवार व सुजाता सोनावणे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदीसह मोठ्या संख्येने विद्यार्थी  उपस्थित होते..कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती.सपकाळे एस जे   यांनी केले तर  आदरणीय शिक्षक श्री. डी ए पवार सर यांनी आभार मानले.




दप्तर मुक्त शाळा उपक्रम

https://drive.google.com/drive/u/1/folders/1YjfqfWa7oA-oVwjKyfA6C6Ziljvh6QK3                                                 दप्तर मुक्त शाळा उपक्रम
                                              दि. ११ जानेवारी २०२०     
 आजचा  उपक्रम :      क्रिकेट सामना 
5 overs 
2 Matches 
4 Teams 
 Commentary हिंदी
आणि मस्त थंडी रंगतदार सामना !उत्तुंग षटकार!!
मा.प्रभाकर भाऊ देवरे यांच्या अध्यक्षतेखाली सामना पार पडला. कोच आदरणीय श्री.Sport शिक्षक   सावकार सर यांच्या मार्गदर्शनाने select केलेल्या teams ने रोमहर्षक खेळ सादर केला.
LIVE सामना बघा LIVE या नावावर क्लिक करा.
सामन्यातील  Photo

विजयी संघाला बक्षिस देताना अध्यक्ष मा.श्री .प्रभाकर भाऊ देवरे आदरणीय मा.मुख्या. श्री.भामरे R.D पर्यवेक्षक श्री.भामरे H.Z श्रीमती सपकाळे madam sport teacher सावकार सर  व   श्री.पवार D.A   सर
 


आध्यात्मिक विचार

                                                          आध्यात्मिक विचार
पुष्प १ ले
                                                       🌸श्रीराम जयराम जय जयराम!                                             🌼जय सद्गुरु!!🙏
                                                           🌷 चिंतन : ११.१.२०२०
             🔥🔥🔥
🍂प्रत्येक जीवात्मा जन्माला येताना ठराविक श्वास घेऊनच जन्माला येत असतो. ते श्वास संपले कि लगेचच सध्याचा देह त्याग करून निघून जात असतो. आपले नातेवाईक, परिचित, मित्र यांचे  अचानक झालेले मृत्यू आपल्याला चटका लावून जातात तर काही जण वर्षानुवर्षे अंथरुणाला खिळून असतात. नकळतपणे आपण सुद्धा त्यांची यातून सुटका झाली तर बरे असा विचार करत असतो.  ती व्यक्ती आणि त्यांची सेवा करणाऱ्या व्यक्ती यांचे एक कार्मिक कनेक्शन असते. ते आधीच्या जन्माचे कर्म या जन्मी त्या विशिष्ट वेळी फळाला आलेले असते. म्हणून त्या व्यक्तीची जमेल तेवढी सेवा करून या कर्म बंधनातून आपली सुटका करून घेणेच योग्य असते. गतजन्मात तुम्ही ज्या जीवाला कळत नकळत त्रास दिलेला असेल तर त्या जीवाचे शिव्या शाप कोणत्या ना कोणत्या जन्मात भोगावे लागतातच. आपल्याला सध्या होणार त्रास हा का होत आहे हे साधनेची विशिष्ट पातळी गाठलेली अध्यात्मिक प्रवृत्ती असलेली व्यक्ती सांगू शकते. आपले आई वडील,भाऊ बहीण, बायको नवरा ,मुले यांच्याशी जो संबंध येत असतो त्याचा संबंध हा पूर्वजन्मांशी असतो. यातील प्रत्येक व्यक्तीचा आपल्याला हिशेब चुकवायचा असतो, मग तो चांगल्या किंवा वाईट कर्मांचा सुद्धा असू शकतो. त्यामुळे आत्ताचा जो जन्म मिळाला आहे तो या सर्वांचे हिशेब चुकवण्यासाठी मिळाला आहे. तो चुकवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करावा आणि आपल्या कर्मबंधनातून मुक्त व्हावे.🌹🙏     🔥🔥🔥
जय जय श्रीराम!! जय जय श्रीराम!!                                                    
                                                                       लेखन: मा.श्री.भामरे सर                                                                             मुख्याध्यापक             

Wednesday, January 08, 2020

मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी वर्षभरातील नवोपक्रम

                       मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी वर्षभरातील  नवोपक्रम 
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन मा.मुख्याध्यापक व शिक्षक वृंद 

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन मा.मुख्याध्यापक हस्ते प्रतिमा पूजन  व शिक्षक वृंद 

स्नेहसंमेलन

स्नेहसंमेलन

स्नेहसंमेलन

स्नेहसंमेलन

स्नेहसंमेलन


दप्तर मुक्र्त शाळा वही खेळ

दप्तर मुक्र्त शाळा वही खेळ

क्रांतिसूर्य ज्योतिबा फुलेविद्यार्थ्याच्या हस्ते पूजन

चला खेळूया

बालगोपाल परिपाठ

परिपाठ

वाढदिवस अभिष्टचिंतन


दही हंडी गोपाळकाला उत्सव


राधा किशन कान्हा


भाषण सावित्रीबाई फुले यांच्या विषयी



प्रतिज्ञा

भारतीय संविधान

सावित्रीबाई फुले जयंती निमित्त विनम्र अभिवादन

के.बि.एच हायस्कूल मा.मुख्याध्यापक श्री. भामरे आर.डी सर , पर्यवेक्षक मा.श्री. भामरे एच.झेड व शिक्षकवृंद

नवोपक्रम व मुलांचा सर्वांगीण विकास

                                                     मुलांचा सर्वांगीण विकास
मुलांच्या सर्वांगीण विकासात  शाळा महत्वपूर्ण भूमिका बजावत असते. त्यांना योग्य ते संस्कार करणे, अभ्यासाची गोडी लावणे, विद्यार्थी हा भावी जीवनात देशाचा नागरिक होणार आहे तो एक चांगला व्यक्ती देशाविषयी अभिमान बाळगणारा असला पाहिजे यासाठी त्याला शिक्षक संस्कार नावाचे बाळकडू पाजत असतात. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हा विद्यार्थ्याच्या जीवनातील महत्वपूर्ण टप्पा असतो. याच वयोगटात त्याच्यावर चागले संस्कार झाले तर तो एक आदर्श नागरिक किवा महान व्यक्ती झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे हि जबाबदारी पालकांइतकीच शिक्षकाची देखील असते. त्याच्या वर योग्य संस्कार झाले तर तो चागल्या मित्रांच्या संगतीत तसेच चागल्या लोकांच्या संपर्कात राहील हेही तितकच खर मुलांमध्ये
 १० मूल्ये हि या शैक्षणिक आयुष्यात रुजलीच गेले पाहिजे.  

 १० मूल्ये खालीलप्रमाणे आहेत 

स्त्रीचा आदर
सार्वजनिक स्वच्छता
सहनशीलता
४ नीटनेटकेपणा
क्षमाशीलता
प्रामाणिकपणा
७ गुरु माता पित्यांचा आदर
८ राष्ट्रीय संपत्ती जपणूक (बस, कार्यालये, सार्वजनिक ठिकाणे इ).
९ अहिंसा
१० आपुलकी
      हे इतर मुल्ये आहेत 

मुलांचा सर्वांगीण विकास  येथे क्लिक करा मुलांच्या सर्वांगीण विकासावर  आधारित पुस्तक दिलीपराज प्रकाशन डॉ. किशोरी पै यांचे अप्रतिम पुस्तक आहे.

मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रमशील शाळा

या वर क्लिक करा