Saturday, May 16, 2020

*नाशिक जिल्ह्यासाठी मोठी बातमी* . मराठा विद्याप्रसारकच्या लॅबमध्ये सव्वा कोटी खर्चाचे नवीन मशीन येणार, ज्यात दिवसाला 500 रिपोर्ट मिळू शकतील. म्हणजेच मालेगाव आणि नाशिकची गरज भागू शकेल.
--

मविप्र लॅबमध्ये येणार दिवसाला ५०० रिपोर्ट देणारे ऑटोमॅटिक मशीन

सरचिटणीस मा.श्रीमती निलिमा पवार यांची माहिती; महिनाभरात मशीन होणार उपलब्ध

हेमंत भोसले | नाशिक

करोना टेस्टचे रिपोर्ट अधिक संख्येने आणि कमी वेळेत मिळण्यासाठी नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्था स्वखर्चाने सुमारे सव्वा कोटी रुपये किंमतीचे ऑटोमॅटिक मशीन आणि त्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करणार असल्याची अतिशय महत्वपूर्ण माहिती संस्थेच्या सरचिटणीस मा. श्रीमती. निलिमा ताई पवार यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना दिली. यामुळे एक दिवसात ५०० रिपोर्ट मिळणे शक्य होणार आहे. या मशिनसाठी संस्थेने निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. पाच आठवड्यात हे मशीन प्राप्त होण्याची शक्यता आहे, असेदेखील निलिमा पवार यांनी स्पष्ट केले.

मविप्रची लॅब असतानाही नाशिकमधील स्वॅब सध्या पुणे आणि धुळे येथील लॅबमध्ये पाठवले जात आहेत. त्यामुळे रिपोर्ट मिळण्यास विलंब होत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मविप्र संस्थेने पुढाकार घेतला असून संस्थेच्या टेस्ट लॅबची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती पवार यांनी दिली. त्या पुढे म्हणाल्या की, सदर मशीनची निर्मिती अमेरिकेत  होते. हे मशीन नाशकात येण्यासाठी चार ते पाच आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. मात्र, एकदा ते आल्यास रिपोर्ट वेळेत मिळण्यातील बहुतांश अडथळे दूर होतील. या मशीनमुळे दररोज किमान ५०० रिपोर्ट तरी हातात पडू शकतात. त्यामुळे नाशिक आणि मालेगावाच्या रिपोर्टचा प्रश्न सुटू शकेल.
--

सध्या दररोज दिले जातात २२५ रिपोर्ट-
सध्याच्या काळात दर चार तासाला स्वॅबमधून ४० ते ४५ मॅन्युअल आर. एन. ए. एक्स्ट्रॅक्शन केले जातात. म्हणजे साधारणपणे ७ तासांत ९० आरएनए मिळतात. त्यानंतर आरटीपीसीआर मशीनद्वारे दोन तासांत ९० रिपोर्ट्स मिळतात. यामुळे सुरुवातीच्या काळात  १५० रिपोर्ट  देण्याचे बंधन होते. परंतु आता रुग्णसंख्या वाढल्याने आम्ही दररोज २२५ रिपोर्ट देत आहोत. त्यासाठी तीन पाळ्यांमध्ये ६० कर्मचारी काम करतात. लॅबसाठी मनुष्यबळ मविप्रचेच आहे. सामग्री मात्र शासन देते. ही सामग्री महिन्याची मिळाली तर विनाअडथळा काम सुरू होईल. मध्यंतरी दोन दिवस काम केवळ सामग्रीअभावी थांबवावे लागले होते. एकदा स्वॅब आम्हाला प्राप्त झाले की ४८ तासांत त्यांचे रिपोर्ट
देण्यासाठी  आम्ही प्रयत्न करतो. त्यामुळे आमच्या पातळीवर रिपोर्ट देताना कुठलाही विलंब होत नाही.

 ७२ पोलीस, सीआरपीएफ जवानांवर उपचार-

मालेगाव येथील पोलीस आणि सीआरपीएफचे ७२ पॉझिटिव्ह कर्मचारी सध्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल आहेत. यापुढील काळात ३०० पोलीस दाखल होऊ शकतील, अशी व्यवस्था आम्ही करुन ठेवली आहे. या पोलिसांच्या जेवणाची व्यवस्था मविप्रकडूनच केली जाते, असेही *मा.निलिमा पवार* यांनी सांगितले.

Wednesday, April 08, 2020

हनुमान जयंती

🕉🕉 *हनुमान जी व आयुर्वेद* 🕉🕉                                                        _*हनुमान जन्मोत्सव निमित्त शुभेच्छा !!*_                                                                                       👉हनुमानजी पवनपुत्र म्हणजेच वायूचे पुत्र असून हनुमंतावर वायू महाभूताचा प्रभाव आहे.आयुर्वेदात पंचमहाभूतांपैकी वायूला खूप महत्त्व असून त्याचे प्रचंड असे सामर्थ्य आहे.या वायु तत्वा मुळेच शरीरातील सर्व क्रिया घडत असतात.परंतु शरीराला उपकारक ठरण्यासाठी वायुला साम्यावस्थेत ठेवावे लागते.                                                            _*"नास्ति तैलात परम् किंचिदौषधम् मारुतापहं।"*_                                                              म्हणजेच वातावर नियंत्रण ठेवण्यासाठी तेल हे श्रेष्ठ औषध आहे.आयुर्वेदात यासाठीच _*नियमित तेलाचा अभ्यंग (मालिश)*_ करायला सांगितले आहे. यामुळे शरीर बलवान/वज्रवत बनते.कदाचित यामुळेच तर नाही दर शनिवारी आपण मारुतीला तेल वाहत असतो ?                                                                                                         👉हनुमानजी माता सीतेच्या शोधात लंकेला जात असताना त्यांचा निथळलेला घाम समुद्रातील मगरीने प्राशन केला व त्यापासून जन्माला आलेल्या हनुमंताच्या पुत्राचे नाव _*मकरध्वज*_ असे होते. याने अहिरावण व महिरावण या राक्षसांना पराभुत केले होते. _*आयुर्वेदात मकरध्वज*_ नावाचे औषध _*रसशास्त्रात*_ सांगितले असून वैवाहिक सौख्य (पौरुष्य) साठी हे बेजोड औषध आहे.हनुमंताच्या पौरुषत्वाचे वर्णनच कदाचित या कथेतून मांडले आहे.                                                                                      👉राम रावणाच्या युद्धाच्या वेळी मेघनाद च्या अस्त्राने लक्ष्मणजी मूर्च्छित पडले असताना _*सुषेन*_ वैद्यांना हनुमानजींनी  लंकेहून आणले होते. _*संजीवनी बुटी*_ च्या शोधात हनुमानजी गेले असता सर्वच वनस्पती चमकतांना दिसल्यामुळे ते पर्वतच उचलून आणतात.याविषयी असा उल्लेख आहे की,राक्षसांच्या मायावी शक्तीमुळे(संभ्रम निर्माण करण्यासाठी) सर्व वनस्पती चमकत होत्या,परंतु काही जाणकार वैद्यांमध्ये अशी मान्यता आहे की _*हनुमानजीं च्या दृष्टीत सर्वच वनस्पती या संजीवनी असल्यामुळे  त्यांना चमकताना दिसत होत्या.*_ असे म्हटलेच आहे की- _*जगत् एवम् औषधं।*_ म्हणजेच या सृष्टीतील सर्वच वनस्पती औषधी आहेत.मात्र असेही म्हटले आहे की _*योजकस्तत्र दुर्लभः।*_ म्हणजेच त्या वनस्पतीची संजीवनी सारखी योजना करू शकणारे(वैद्य) मात्र दुर्लभ आहेत.                                                           👉हनुमान जयंती/रामनवमीला  _*सुंठवडा*_  प्रसाद म्हणून वाटला जातो.यात _*सुंठ,साखर व खोबरे*_ असते.यादरम्यान वसंत ऋतू असल्याने सुंठ कफविकारासाठी व वातनाशक म्हणून _*कंबरदुखी, आमवात, संधीवात*_ कमी करण्यासाठी उपयुक्त असते.सुंठ वात,कफ कमी करतेच त्या बरोबर पचन सुधारते व पौरुष शक्ती ही वाढवते.                                *डॉ.शशिकांत कापडणीस*                                                         *(आयुर्वेदाचार्य)*                                                                                                                                                                                                                                                                                               

Thursday, April 02, 2020

क्रिकेट मधील डक वर्थ लुईस या नियम सर्वाना परिचित आहे जाणून घेऊ त्याविषयी....

निधन
लुईस:-
••••••••••••••••••••••••••••••••••••••••
● आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटला प्रसिद्ध डकवर्थ-लुईस नियम देणाऱ्यांपैकी गणिततज्ज्ञ टोनी लुईस यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले. क्रिकेटला डकवर्थ-लुईस-स्टर्न (DLS) पद्धत देणाऱ्या समितीचे ते सदस्य होते. मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यांमध्ये डकवर्थ-लुईस पद्धत वापरली जाते.

● सिडनी येथे झालेल्या १९९२ वर्ल्ड कपच्या उपांत्य सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यानंतर DLS सूत्र तयार करण्यात आले. इंग्लंडला पराभूत करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला १३ चेंडूंत २२ धावांची आवश्यकता होती. पावसाच्या व्यत्ययानंतर एका चेंडूवर २१ धावा करणे अशक्य होते. त्यानंतर काही काळातच हे सूत्र वापरण्यात आले.

● टोनी यांनी सहकारी गणिततज्ज्ञ फ्रँक डकवर्थ यांच्यासमवेत डकवर्थ-लुईस पद्धतीचा ११९७ मध्ये शोध लावला. ICC ने १९९९ मध्ये अधिकृतपणे स्वीकारला. २०१४ मध्ये डकवर्थ-लुईस-स्टर्न सूत्रानुसार या नियमाचं नाव बदलण्यात आलं. मर्यादित षटकांच्या सामन्यात पाऊस पडला तर या पद्धतीचा वापर केला जातो.

● DLS नियमावर बर्‍याचदा टीका करण्यात आली. ऑस्ट्रेलियन आकडेवारीतज्ज्ञ स्टीव्हन स्टर्न यांनी २०१४ मध्ये ‘स्कोअरिंग रेट’च्या आधारावर नियमात सुधारणा केली. २०१४ मध्ये नाव बदलल्यानंतरही गणिताचे हे सूत्र जगभरात पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यांमध्ये वापरले गेले.

Sunday, March 29, 2020

करोना ला रोखुया

(चला शासनाला मदत करूया आपले कार्य आपण करूया)
          
प्रति,
   सन्माननीय पालक,
      आपल्या मुलांच्या शाळेला सुट्ट्या दिलेल्या आहेत व व पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षाही रद्द करण्यात आलेले आहेत. आपल्या पाल्याची परीक्षेच्या बाबतीत अजिबात चिंता करू नका आपल्या स्वतःची व आपल्या मुलाची  काळजी घ्या .अभ्यासाच्या बाबतीत व परीक्षेच्या बाबतीत अजिबात चिंता करू नका सर्व परीक्षा रद्द झालेल्या आहेत पहिली ते आठवीपर्यंतच्या काही अडचण असल्यास आपण मला (वर्गशिक्षकांना) तात्काळ संपर्क करा. मला माहित आहे आपल्या प्रत्येकाकडे फोन आहे आपण शेतात जरी असाल तरी फोन करून विचारू शकतात. पण आपल्या मुलाला गर्दीच्या ठिकाणी घेऊन जाऊ नका किंवा पाठवू नका.शासनाने का बरं आपल्या पाल्याच्या शाळेला सुट्ट्या दिल्या असतील..? या प्रश्नाचा गांभीर्याने विचार करा.
    आपल्या मुलाला का बर सुट्ट्या दिलेल्या आहेत या बाबींचे कारण जाणून घ्या , सुट्टी ही गंमत म्हणून दिली नाही,परीक्षा या गंमत म्हणून रद्द करण्यात आलेले नाहीत या बाबीचे गांभीर्य लक्षात घ्या. आपल्या राज्यातच नाहीत तर  अनेक राज्यातील शासनाने शाळा महाविद्यालय यांना सुट्ट्या जाहीर केले आहेत .याच बरोबरीला परीक्षाही ही रद्द करण्यात आलेल्या आहेत. कारण... विविध राज्यात जीवघेणा *कोरोना* नावाचा संसर्गजन्य व्हायरस पसरतो आहे त्याला प्रतिबंध म्हणून ही सुट्टी जाहीर केली आहे व परीक्षाही रद्द करण्यात आलेले आहे.कारण लहान मुलं ही लगेच कोणाच्याही संपर्कात येतात,त्यांना स्वच्छतेची जाणीव नसते,चांगलं वाईट समजत नाही म्हणून ही मुले एखाद्या संसर्गजन्य रोगाच्या सहज आहारी जाऊ शकतात, म्हणून घरात मुले राहतील तर ती जास्त लोकांच्या संपर्कात येणार नाहीत,त्यांच्या पालकांचे त्यांच्याकडे लक्ष राहील,सुयोग्य आहार घेतील,तसेच स्वतःच्या स्वच्छ तेकडे लक्ष देतील, संसर्ग होणार नाही व त्यामुळे कोरोना सारख्या आजाराला बळ मिळणार नाही,हा सुट्टी देण्यामागचा व परीक्षा रद्द करण्यामागचा आपल्या प्रशासनाचा चांगला हेतू आहे.
म्हणून पालकहो ..मुलांना सुट्टी लागली म्हणून मामाच्या, किंवा इतर नातेवाईक यांच्या गावाला पाठवू नका, त्यांना पिकनिक किंवा गर्दीच्या ठिकाणी, पर्यटन स्थळे, सहल इत्यादी ठिकाणी पाठवू नका, सुट्टी आहे म्हणून त्यांना बाजार, यात्रा महोत्सव, इत्यादी ठिकाणी पाठवू नका किंवा तुम्ही ही जाऊ नका,आपले घर,शेती,शाळेचा अभ्यास इ मध्ये त्यांचे मन रमवा. काही अडचण असल्यास मला (आपल्या मुलाच्या शिक्षकांना) जरूर फोन करून कळवा. शिक्षकाने सांगितल्याप्रमाणे आपल्या मुलाचा प्रत्येक विषयाचा दररोज सराव घ्या.; प्रश्नोत्तरे, प्रश्नपत्रिका सराव, लेखन,वाचन यांचा सराव घ्या...; आम्ही सांगितलेल्या यूट्यूब चैनल ला विद्यार्थ्यांना भेट द्यायला सांगा यूट्यूब चैनल वर विविध शिक्षक आणि आणि तयार केलेले शैक्षणिक साधने उपलब्ध आहेत त्यांचे मन तिथे अवश्य रमेल.
फोन,वॉट्सअप्प, मेसेज या माध्यमातून आपल्या पाल्याच्या शिक्षकांच्या संपर्कात राहा, आपले सर्व शिक्षक आपणास सुव्यवस्थित मार्गदर्शन करतील,होमवर्क वगैरे देतील,पण मुलांच्या अभ्यासात खंड पडू देऊ नका... आपल्या शंका ,अडचणी नक्की विचारा, मुलांना अनोळखी व्यक्तींच्या, परदेशी पाहुण्यांच्या संपर्कात जाऊ देऊ नका, बाहेरील वस्तू खाऊ देऊ नका, उघड्यावरील वडापाव, आईस्क्रीम, बर्फ गोळा, आईस कांडी, पाणीपुरी,भेळ अशा वस्तूंपासून चार हात दूर ठेवा..
फक्त पुढचा आठवडा आपल्याला जपायचे आहे,आणि या कोरोनावर विजय मिळवायचा आहे.आपण आपल्या गावाचे,शहराचे जागृक नागरिक आहोत हे आपण इतर शहरांना दाखवून देऊ चला तर मग स्वच्छता बाळगूया व करोनाला हद्दपार करूया.
                                                          आपले शिक्षक

मराठी दर्जेदार नाटके

*List of Hit Marathi Natak*
(With links)


• बटाट्याची चाळ
https://youtu.be/5i1xaSZeyOM

• श्रीमंत दामोदर पंत
https://youtu.be/U7350LnlKCk

• शांतता ! कोर्ट चालु आहे
https://youtu.be/QG_Pi051qao

• नटसम्राट
https://youtu.be/yTFPT7-v-Ws

• ती फुलराणी
https://youtu.be/PLHfek5SO_Q

• तो मी नव्हेच
https://youtu.be/8TAToq08YuQ

• पती सगळे उचापती
https://youtu.be/6IZXCmrE09s

• मोरुची मावशी
https://youtu.be/eCOeRK9N7QM

• एका लग्नाची गोष्ट
https://youtu.be/JZl_zwm_IPI

• हसवा फसवी
https://youtu.be/v4-MqXYJq6o

• गेला माधव कुणीकडे
https://youtu.be/1gEZ0WePqV4

• तुझे आहे तुजपाशी
https://youtu.be/sTZGYKAWc_4

• असा मी असामी
https://youtu.be/S38SOv4f95w

• शांतेच कार्ट चालु आहे
https://youtu.be/twOnQ3JCTxE

• श्री तशी सौ
https://youtu.be/N4pwOnoY7zY

• वासु ची सासू
https://youtu.be/-m3iruEQoJE

• अखेरचा सवाल
https://youtu.be/DmuCU9Y33sg

• शूऽऽऽ.. कुठं बोलायचं नाही
Part 1 - https://youtu.be/07R2IFyyJ9E
Part 2 - https://youtu.be/GsOOVwUmqx8

• चल कहितरीच काय
https://youtu.be/blOdn2nbDgw

• चार दिवस प्रेमाचे
https://youtu.be/PD-mBpCvTAw

• मी नथुराम गोडसे बोलतोय
https://youtu.be/PD-mBpCvTAw

• कुर्यात सदा टिंगलम
https://youtu.be/LHBWfTRQvvo

• तुझ्या माझ्यात
https://youtu.be/94YChmH9GYo

• खर सांगायच तर
https://youtu.be/uMJ9gA2TFrM

• सखाराम बाईंडर
https://youtu.be/NIMIgL-OLXc

• कुसूम मनोहर लेले
https://youtu.be/2AH8SgZ2qSI

• अशी पाखरे येती
https://youtu.be/kqo2tjug3AU

• सेलीब्रेशन
https://youtu.be/dR6r75iUGXE

• अप्पा आणी बाप्पा
https://youtu.be/2z4ndcpOLJU

• कार्टि काळजात घुसली
https://youtu.be/p_FgFnDnFGc

• बॅरिसटर
https://youtu.be/ZW73zW21eXQ

• मित्र
https://youtu.be/tKpPpGWJTzw

• अश्रूंची झाली फुले
https://youtu.be/5HZYa1s1OXo

• डाॅक्टर तुम्हीसुद्धा
https://youtu.be/SVY0mq7FO1Y

• डबल गेम
https://youtu.be/v3EFucCuMdM

• सूर राहु दे
https://youtu.be/ZeT8mqNDkss

• गोड गुलाबी
https://youtu.be/XZ5pC8x8nQY

• अधांतर
https://youtu.be/ECwRnB8n2z4

• सुंदर मी होणार
https://youtu.be/L0BD4s5FQgM

• नातीगोती
https://youtu.be/F7dlUMpA5JU

साथीचे रोग

निसर्गाशी प्रतारणा, जीवनाशी खेळ
‘‘कभी जो ़ख्वाब था वो पा लिया है
मगर जो खो गई वो चीज़ क्या थी’’
सर्वांगिण प्रगतीचे जे स्वप्न उभ्या मानवजातीचे होते ते साकार होत असताना आपल्याकडून हरवत गेलेली सामाजिक व्यवस्था, सार्वजनिक आरोग्य व त्यांच्या असंतुलनाने उद्भवणारे प्रश्‍न कोणते याचा विचार करावयास लावणारी आजची परिस्थिती, जागतिक आरोग्य संघटनेची (थकज) पुर्नरचना होणे गरजेची याचा पुर्नविचार किंबहुना प्रतिपादन सध्या अमेरिकेचे पंतप्रधान ट्रम्प व भारताचे पंतप्रधान मोदी करत आहे. जगाची आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेची आजच्या इतकी असहाय्य (बेबस) अवस्था कधीही झाली नव्हती. चीन निर्मित कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातल्यानंतर संपूर्ण वाताहत झालेले इटली, फ्रान्स, स्पेन सारख्या युरोपियन देशानंतर भारताचा क्रमांक लागेल किंवा नाही याचे उत्तर येत्या काही दिवसात मिळेेल परंतु भारतासारख्या अवाढव्य लोकसंख्या असलेल्या देशातील तमाम नागरिकांनी सरकारने जाहिर केलेले लॉकडाऊनचे पालन केले तरच या देशातील नागरिक सुजान व देशप्रेमी आहे यावर शिक्कामोर्तब होईल. परंतु सद्यस्थितीत संपूर्ण जगाला जे काही भोगावे लागत आहे त्याची पाळेमुळे निश्‍चित आंतरराष्ट्रीय पातळीवरील धोरणांशी संबंधित आहे हे विसरून चालणार नाही. ती समस्त मानवप्राण्यांची कहाणीच होय.
ऐक मानवप्राण्या, तुझी कहाणी
तू घडलास कसा?
मुठभर होतास संख्येने
लाखभर वर्षांमध्ये आठेक अब्ज झालास
दोनशे देश, हजारो भाषा, शेकडो संस्कृती
अनेक धर्म, अनेक जाती-जमाती
अगणित तंत्र आणि शास्त्र
नैसर्गिक विविधता व विपूलता
हे ‘एका’च अनेक होणं ही तुझी कहाणी
अनेक प्रश्‍न सोडवत इथपर्यंत आलास
दर पावलाला नवे प्रश्‍न उत्पन्न केलेस
‘माणुसकी’ म्हणजे काय?
अमानूषता कशात असते
पदोपदी या प्रश्‍नांना सामोरा जातो आहेस
कधी जाणीवपूर्वक अनेकदा अजाणताच
पाहा तर, 
ही छोटीशी कालानुरुप तयार केलेली
स्वत:ची कहाणी - उत्तर शोधायला
मानवी विकास, विज्ञानाची प्रगती या बाबी निसर्ग किंवा पर्यावरण यांपासून कधीही अलिप्त राहिलेल्या नाहीत. त्यांचा एकमेकांवर चांगला वाईट परिणाम सातत्यानं होत आलेला आहे. जागतिक तापमानाच्या समस्येनं मानवाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. मानवी अस्तित्वाचा हा प्रवास आणखी वेगवान होण्यासाठी बायोटेक्नॉलॉजीमधील विकास व त्यातील संशोधनाचे टप्पे महत्वाची भूमिका बजावत असतानाच ज्यावेळी निसर्गानं मानवी हस्तक्षेपाचे परिणाम म्हणून काही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या त्या वेळी अशा हस्तक्षेपांना नियंत्रित न करता प्रतिक्रिया नियंत्रित करण्याचा प्रयत्न मानवी र्‍हासाला कारणीभूत होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आपण अनेक रोग आणि विकारांवर मात केली असं म्हणतो. प्रत्यक्षात मात्र अशा रोग आणि विकारांची लक्षणं किंवा विकारांचं स्वरुप फक्त बदललं आहे असचं म्हणावं लागेल. विविध आजाराच्या नियंत्रणासाठी प्रतिजैविके , स्टिरॉईडस व इतर औषधाची निर्मिती निरंतर चालू आहे. ज्या डासांमुळे मलेरिया किंवा इन्फ्लूएंझा पसरतो त्यांचे नियंत्रण करताना क्लोरोक्विन, सल्फोनामाईड, आमाइडोक्विन यासारख्या औषधांचा वापर करून डासांची प्रतिकारशक्तिच आपण अजाणतेपणे वाढवीत चाललो आहोत. असचं काही अनेक आजारांबाबत घडत आहे. बायोटेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण निसर्गामध्ये वेगवेगळे नवनवे जंतू आणि विषाणू सोडत आहोत की, ज्यांच्यावर नियंत्रण कसं ठेवायचं याची यंत्रणा आज जगाकडे नाही. (कोरोना हे एक ताजे उदाहरण) 
आजपर्यंत मानवाने साथीचे रोग पाहिले ते विशिष्ट हवामानात किंवा विशिष्ट अवस्थेमध्ये पसरल्याचे मानवाला माहित आहे परंतु सार्स, स्वाईन फ्ल्यू, बर्ड फ्ल्यू आणि आताचा कोविड 19 यांनी वैश्‍विक संक्रमणाचा संदेश दिलेला आहे. तो समस्त मानव जातीला नष्ट करण्यासाठीच आहे. आपली पिके, आपली आहार पद्धती, आपली जीवन पद्धती या सर्वांतून आपण निसर्गालाच आव्हान देतो आहोत. जेनेटिक इंजिनिअरींग या तंत्रामध्ये मानवाचा विकास आणि नाश दोन्हीही सामावलेले आहे. एखाद्या आजाराचं कारण आणि आजाराचं मूळ शोधून काढून त्यामध्ये बदल करण्याची क्षमता मानवाच्या हाती आली आहे आणि या बदलातूनच नवनवे विकारही निर्माण झाले किंवा आपणच तयार करत आहोत, जैविक विज्ञान, जेनेटिक इंजिनिअरींग अशा विषयांवर सातत्याने चर्चा घडविणार्‍या एका व्यासपीठाने तर या वैज्ञानिक प्रगतीच वर्णन मानवाचा हिरोशीमाकडे सुरू असलेला प्रवास असे केलेेले होतं. परंतु कोविडमुळे माझ्या मते मानवजमातीचा समूळ नाश होण्याकरीता मानवानेच टाकलेले हे पाऊल आहे असे म्हटले, तर वावगे ठरणार नाही. मानवी इतिहासाचा वेध घेतला तर असे काही विकार एकविसाव्या पिढीतील मानवाला अस्वस्थ करून टाकतील त्यामध्ये पृथ्वीवर वाढणारे लोकसंख्येचे ओझं, शहरांमध्ये वाढणारी अनियंत्रित गर्दी ही कोणत्याही रोगाला आमंत्रण देणारीच ठरेल. जगाच्या विविध कानाकोपर्‍यात मोठमोठ्या झोपडपट्यांमध्ये जवळजवळ 100-120 कोटी लोक राहतात. त्यांच्या आरोग्याची नीटशी व्यवस्था नाही किंवा त्यांना सकस आहार देण्याची क्षमता नाही. अशा परिस्थितीत भारत, पाकिस्तान सारखे प्रगतशील व इतर मागासलेले देशातील शहराची शहर लॉकडाऊन किती दिवस करता येतील याचा सुद्धा विचार होणे गरजेचे आहे. 
वाढत्या  लोकसंख्येच्या गरजेपोटी सुरू झालेल्या हायब्रीड अन्नोत्पादनाने अनेक प्रश्‍न निर्माण केले आहे. पेस्टिसाईड व रासायनिक खतांच्या  बेसुमार वापरामुळे मोठ्या प्रमाणात निर्माण होणार्‍या निकस अन्नधान्य व फळेभाजीपाला उत्पन्नामुळे प्राणीजन्य अन्न सेवनाचे प्रमाण वाढले, त्यामुळे श्‍वसनयंत्रणा, त्वचारोग, कॅन्सर, डायबेटीस सारख्या रोगांबरोबरच सर्वात महत्त्वाचे म्हणजे जवळ जवळ 118 विविध प्रकारचे अ‍ॅटोइम्युनिटी सिंड्रोम असलेले आजार बळावत चालले आहेत. त्याची तीव्रता शहरांमधील विविध हॉस्पिटलमध्ये पेशंटची वाढलेली संख्याच सर्व काही सांगून जाते.
इंधन आणि बाजार : दुसर्‍या महायुद्धानंतर अमेरिकेने आर्थिक महासत्ता होण्यासाठी जगभरामध्ये इराण, इराक, इस्त्रायल, सौदी अरेबिया, रशिया, भारत, पाक, उत्तर व दक्षिण कोरिया, व्हिएतनाम यासारख्या देशांना कायमस्वरूपीच्या युद्धझळामध्ये गुंतवून ठेवून इंधनाचा बेसूमार वापर केलेला आहे. त्यामुळे चीन, कोरिया व मोडकळीस आलेल्या सोव्हिएत युनियन यांच्या कम्युनिस्ट विचारांची औद्योगिक मक्तेदारी, साम्राज्यवाद व मुक्त अर्थव्यवस्था व भांडवलशाहीचा उगम होतानाच  प्रदुषित जल,  हवा व जमिनीमधून काढण्यात येणार्‍या इंधनाने निसर्गाचा समतोल पुर्णपणे बिघडला आहे. गेली पन्नास साठ वर्षांमध्ये समुद्राच्या वरच्या 300 मीटर भागातले पाणी 0.2 अंश से. तर पृष्ठभागाचे तापमान 0.4 ते 0.8 अंश से. ने वाढल्यामुळे सागरी जीवसृष्टीच्या र्‍हासाबरोबरच जलावरण-हिमावरण (चक्रीवादळे, सुनामी, महापूर, पर्वतीय हिमनद्या वितळण्याच्या प्रमाणात वाढ) सारखे प्रश्‍न उद्भवत आहे, उत्सर्जित वायुचे वाढलेले प्रमाण त्याच्या प्रतिबंधासाठी केलेले आतंरराष्ट्रीय कायदे व नियम अमेरिका, चीनसारख्या व काही युरोपियन राष्ट्रांनी पायदळी तुडविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करून संपूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या युद्धाच्या माध्यमातून आपली दादागिरीचे दर्शन घडविले आहे. 
जगाची वाढ तशीींळलरश्र पद्धतीने होत असताना त्यास भारतसुद्धा अपवाद नाही. विविध संस्कृतीचे, औद्योगिक प्रगतीचे टप्पे ओलांडताना भारताची माध्यमांच्या नजरेतून तयार केलेली अभासी प्रतिमा ही एक फसवणूकच आहे.
भारतामध्ये धार्मिक छळवादाची नवीन संकल्पना समाजामध्ये रुढ होत आहे. त्याचे हिडीस प्रदर्शन माध्यमांमध्ये व हिंदू व मुस्लिम धर्मप्रेमींमध्ये पेरले जात आहे. धर्मोपदेश करणारे नवनवे संप्रदाय रोज निर्माण होत आहे. गाय, गोबर, मनुस्मृती, प्रखर इस्लाम मुलतत्ववादसारख्या विषयांमधून धर्माधर्मात व समाजासमाजामध्ये अंतर पडत आहे. संप्रदाय व त्यांच्या प्रमुख सद्गुरुंचे स्तोम  माजविण्यासाठी सर्व प्रसारमाध्यम सरकारांच्या माध्यमातून प्रभावीपणे वापरली जात आहे. अक्षरश: मोजदाद अशक्य व्हावी एवढा या संप्रदायाचा आपल्या समाजात सुळसूळाट झालेला आहे. खेड्यांतून नव्हे सध्या शहरातून ही लोक हुरळेल्या मेंढीनं लांडग्याच्या मागं लागावं तस या नव्या धर्मावताराकडे मोठ्या संख्येने आकर्षित होत आहे. अनेकजण तर त्या ‘अवतारी’ मंडळीच्या संमोहनाने भारले जाऊन आपल्या इस्टेटी, शेतजमीनीही त्यांच्या कौटुंबिक ट्रस्टांच्या झोळीत टाकत आहे. धार्मिकतेला एवढं अभूतपूर्व उधाण का आलं हे दैववादी समाजापुढील सर्वात मोठ आव्हान आहे. दुसरं असं की जे आमचे मुलभूत सामाजिक व आर्थिक प्रश्‍न आहेत त्याची उत्तरं या धार्मिक जागृतीतून कदापि मिळणार नाही अस असतानाही भारतातील कुटुंबव्यवस्था आरोग्य व सामाजिक प्रदुषणाच्या विळख्यात आहे. आर्थिकस्थिती जेमतेम असताना राजकीय व सामाजिक मोठपण सिद्ध करण्यासाठी भव्यदिव्य सण, निवडणुकांमध्ये मग्न असलेली जनता, लग्न समारंभ, अध्यात्म गुरुचे मेळावे त्यातील अमर्यादित जेवणावळी, ग्रंथपठणाचे सोपस्कार पाडाण्यात मग्न आहे. परंतु संपूर्ण समाज जीवनाची वाताहत झाल्याने समाजात मानसिक पसरलेली रोगट आणि आत्मकेंद्रीत व्यक्तीवाद त्यातून सतत जाणवणारी असहाय्यता सर्वकाही विचारांच्या पलीकडे.
सार्वजनिक आरोग्याची तर ऐसी तैशी हे पुन्हा एकदा कोविडमुळे सिद्ध झाले. युद्धासाठी अण्वस्त्रांची तर आता गरज उरलेलीच नाही. आता फक्त वाटा शोधाव्या लागतील. समृद्ध व शाश्‍वत जीवनाच्या. कारण भारतीय समाजामध्ये समाजजीवनाची अंग वेगवेगळी आहेत म्हणून शाश्‍वत विकासासाठी अनुरुप जीवनशैली स्वीकारणे हेच ध्येय असले पाहिजे. कारण मानवनिर्मित भेदभाव निसर्ग मानत नाही, त्याला सगळे सारखेच असतात. आज हजारो मृत्यू होत आहेत. निसर्गाने कोणताही धर्म, वर्ण, जात, देश, गरीब, श्रीमंत दाखविला नाही. सर्वकाही गतीविरहित जगणं आणि त्या जगण्यासाठी धडपड. 
चीनच्या विषाणूमुळे आज सर्व जग चीनला दोषी ठरवत आहे. परंतु ग्लोबल ट्रेडींगच्या नावाखाली संपूर्ण जगाने चीनने उत्पादीत केलेल्या सुईपासून ऑटोमोबाईल्स, सिमेंट, अन्नधान्य, इलेक्ट्रॉनिकवस्तु, फर्निचर, वस्त्र, मोबाईल, फार्मास्युटीकल्स, खते यासारख्या विविध वस्तुंची बाजारपेठ जगातील अनेक देशांमधील खेड्यापाड्यांमध्ये उभी केली. पर्यटनव्यवसायाच्या नावाखाली तर तथाकथित हौशे, नवशे व आर्थिक समृद्धी प्राप्त झालेल्यांनी तर हैदोसच मांडला होता. आपल्या भौगोलिक व जीवनाचा स्तर किंवा उंची याचा विसर पडत असताना परदेशी प्रवास व त्याद्वारे चंगळवादाला मिळणारे प्रोत्साहन हे स्टेटसचे प्रतिक झाले होते. त्याच्या जाहिराती म्हणजे दररोजच्या वर्तमानपत्राची एक अभूतपूर्व अशी मेजवाणी व सामान्यांना लालसेमध्ये गुंतवून ठेवणारी एक साखळी कार्यरत आहे.
रॉयल सोसायटी ऑफ लंडन या विज्ञानातील सर्वात मोठ्या अन् मान्यताप्राप्त संस्थेचे अध्यक्ष लॉर्ड मार्टिन रीच यांच्या शब्दात सांगायच तर हे शतक मानवाचे अखेरेचे शतक आहे. त्याचं अस्तित्वच आज धोक्यात आलेलं आहे. गेल्या शतकातील विज्ञानाच्या वेगवान प्रगतीचा हा परिणाम आहे. आता आपण अशा उंचीवर पोहोचलो आहोत की, तेथून खाली उतरायचं कसं हे कळेनासं झालं आहे. विकासाच्या वाटेवरून आज विनाशाच्या दिशेनं प्रवास सुरू झालाय आणि तोही वेगानं होतोय. अखेरची घंटा ऐकायची असेल तर पर्यावरणाचा विचार प्राधान्याने करावा लागेल. ओझोनच्या थराला पडलेलं भगदाड, ग्रीन गॅसचे परिणाम, वाढते तापमान, वाढते प्रदुषण अशा विविध लेबल्सने या समस्या जगाबरोबर भारताच्या उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत. विविधतेने परिपूर्ण असलेल्या या देशामध्ये सर्वकाही शक्य आहे. त्यासाठी संकल्प हवा, पर्यावरण संरक्षणाचा व त्यामाध्यमातून सार्वजनिक आरोग्य जपण्याचा...

करोना विषाणू

​​​​Coronavirus: करोना विषाणूचा फोटो घेण्यात यश; ‘एनआयव्ही’च्या वैज्ञानिकांची कामगिरी

भारतात ३० जानेवारी रोजी पहिला करोना रुग्ण सापडला होता त्याच्या नमुन्याआधारे हे प्रतिमा चित्रण करण्यात आले आहे.

भारतातील करोना विषाणू (कोविड १९) प्रतिमा मिळवण्यात पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या (एनआयआव्ही) वैज्ञानिकांना यश आले असून या प्रतिमा इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक छायाचित्र तंत्राने घेण्यात आल्या आहेत. या प्रतिमा इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रीसर्च या नियतकालिकात प्रसिद्ध होणार असून भारतात ३० जानेवारी रोजी पहिला करोना रुग्ण सापडला होता त्याच्या नमुन्याआधारे हे प्रतिमा चित्रण करण्यात आले आहे.

वुहानमधून परतलेल्या तीन विद्यार्थ्यांमधील एका मुलीला परत आल्यानंतर करोनाची लागण दिसून आली होती. ही मुलगी केरळातील असून तिच्या घशातील नमुन्यात सापडलेल्या या विषाणूंच्या प्रतिमा मध्यपूर्व श्वासन रोगाशी साधर्म्य असलेल्या आहेत. ज्याला मीडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम म्हणतात. तो विषाणू करोनाचाच प्रकार होता व २०१२ मध्ये त्या रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. आताचा विषाणू हा २००२ मधील सार्स-करोना विषाणूशीही साधर्म्य दाखवणारा आहे.

विषाणूच्या प्रवासाचा उलगडा होऊ शकतो

भारतीय वैद्यक संशोधन परिषदेचे माजी संचालक डॉ. निर्मल गांगुली यांनी सांगितले की, “करोना विषाणूवर काट्यांसारखी रचना असते त्यामुळे त्यांना करोना म्हणतात. त्यावर शर्करा व प्रथिन संग्राहकांचा समावेश असतो. ते काटे पेशीत रुतले जातात व नंतर यजमान पेशीला चिकटून विषाणू आत घुसतो. विषाणूचे जे प्रतिमा चित्रण करण्यात आले आहे त्यावरून त्याचे जनुकीय मूळ व उत्क्रांती समजते व त्यातून हा विषाणू प्राण्यातून माणसात व नंतर माणसातून माणसात कसा पसरला याचा उलगडा होऊ शकतो.”

विषाणूंचा आकार गोल

पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत केरळातील नमुने तपासण्यात आले. त्यानुसार भारतातील कोविड १९ विषाणू हा चीनच्या वुहानमधील विषाणूशी ९९.९८ टक्के जुळणारा आहे. अजून तो उत्परिवर्तित होत असून त्यावर औषधे व लसी बनवता येतील. पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेतील इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी रोगनिदान विभागाचे उपसंचालक डॉ. अतनु बसू यांनी सांगितले की, “विषाणूचा अभ्यास केला असता त्याचा कण हा ७५ नॅनोमीटरचा दिसतो, त्याचा काटा हा ग्लायकोप्रोटिनचा असून त्यामुळेच तो यजमान पेशीत घुसू शकतो. केरळातील मुलीच्या स्राव नमुन्यातील ५०० मायक्रोलिटर भागातून हा विषाणू वेगळा काढण्यात आला व त्याची चाचणी पॉलिमरेज अभिक्रियेने करण्यात आली. त्यातील द्रव भाग वेगळा काढून १ टक्के ग्लुटारेल्डीहाइडच्या मदतीने व नंतर कार्बन आवरण असलेल्या तांब्याच्या गाळणीतून गाळला गेला. त्यानंतर सोडियम फॉस्फोट्युनिस्टिक आम्लाचा वापर करण्यात आला. नंतर १०० केव्हीच्या इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीच्या मदतीने कॅमेरा लावून त्याच्या प्रतिमा घेण्यात आल्या. हा विषाणू ७०-८० नॅनोमीटरचा असून त्यात १५ नॅनोमीटरचे कवच आहे. अशा सात विषाणू कणांचे चित्रण यात करण्यात आले. या विषाणूंचा आकार गोल दिसून आला आहे.”

Wednesday, March 11, 2020

पर्यावरण पूरक होळी

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁                                                         ☘☘☘☘  *होळी*  ☘☘☘☘                                                            🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁                                                                                                                                                       होलिकोत्सव प्राकृतिक,प्राचीन व वैदिक उत्सव आहे. याबरोबरच आरोग्यदायक, आनंददायक व अल्हाददायक उत्सव आहे.प्राकृतिक उत्सव या दृष्टीने की,या दिवसांत निसर्गतःच सगळीकडेच विविध रंगांची उधळण होत असते.वृक्ष-वेलींना विविधरंगी फुले व नविन पालवी येत असते.जणु काहीं निसर्गच होळी खेळत असतो. *हो.. ली.. म्हणजेच जो हो गया, सो हो गया।* म्हणजेच मनातील पूर्वीचे राग द्वेष दूर करा… *बुरा न मानो होली है।*                                                                                                                         👉हा वैदिक उत्सव आहे. लाखो वर्षापूर्वी भगवान राम व त्यांच्या आधी रघु राजा त्यांच्या आधी  सुद्धा राजा दिलीप यांच्या   राज्यातही होळी साजरी केल्याचे उल्लेख आहेत.                                                              👉पळसाच्या फुलाचा रंग, केसर, चंदन व गुलाबाच्या पाकळ्या चूरून तयार केलेल्या रंगाने राजे हे होळी खेळत.                                                                                                                  👉आजकाल रसायनिक रंगांचा वापर होळी खेळण्यासाठी केला जातो. त्याचा तन-मनावर दुष्परिणाम होतो.काळया रंगातील लेड ऑक्साइड किडनीवर दुष्परिणाम करतो. लाल रंगातील कॉपर सल्फेट कॅन्सरला कारणीभूत असतो. जांभळा रंग दमा व अॅलर्जी वाढवतो. सर्वच रासायनिक रंगांमुळे कोणत्या ना कोणत्या आजारांना आमंत्रण मिळते.                                                          👉 उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये पळसाला लाल/केशरी रंगाची फुले लागलेली असतात. वेद शास्त्रामध्ये पळसाच्या फुलाच्या रंगांनी होळी खेळली जात असल्याचे उल्लेख आहेत. पळसाच्या फुलांना रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवल्यास पाण्याला छान केसरी रंग येतो. हा रंग होळी खेळण्यासाठी सर्वात योग्य आहे. याच्यात औषधी गुण आहेत. *आयुर्वेदानुसार पळस कफ,पित्त, त्वचारोग, मूत्रदोष व रक्ताचे विकार नाहीसे करतो तसेच वाढणाऱ्या सूर्याच्या दाहा पासून संरक्षण देतो, रक्तसंचार नियमित करतो व मांस पेशींना बळ देतो तसेच मानसिक शक्ती व कामेच्छा वाढवतो.*                                                                                                👉या काळामध्ये हलके व कमी मिठाचे   भोजन घ्यावे व गुढीपाडव्याच्या दरम्यान वीस-पंचवीस कडुलिंबाची पाने हिंग, मिरी, साखर व ओव्या बरोबर रोज सकाळी चावून खावी. याने  निरोगी राहण्याची खात्री मिळते.                                            *आशा करू या की सर्वजण अशीच पर्यावरण पूरक व आरोग्यदायी होळी साजरी करतील. सर्वांना होळीच्या खूप खूप बहुरंगी शुभेच्छा !!!*                                                  🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                🍁🍁🍁🍁🍁

कोरोना व्हायरस

*कोरोना विषाणू : मानवजातीवर सुटलेले ब्रम्हास्त्र.*               सूर्यापासून फेकल्या गेलेल्या वायूच्या धगधगत्या गोळ्यातुन पृथ्वीची उत्पत्ती सुमारे ४८० कोटी वर्षांपूर्वी झाली.  सुमारे ३८५ कोटी वर्षांपूर्वी पहिले सजीव, म्हणजे अतिसूक्ष्मजीव  अवतरले. नंतर तीन साडेतीनशे कोटी वर्षे पृथ्वीवर सूक्ष्मजीवांचे राज्य होते. आपल्या कल्पनेतही न बसणारे, पृथ्वीवरील तापमान व वातावरणाचे टोकाचे बदल व  प्रतिकूलता त्यांनी पचवली. पृथ्वीवरील सजीव जैविक वस्तुमानाचा विचार केला तर त्यापैकी साधारण ८०% भाग हा सूक्ष्मजीवांचा आहे. दिसणाऱ्या सजीवांच्या २० कोटी व सूक्ष्मजीवांच्या सुमारे ४० कोटी प्रजाती, शंभर वर्षांपूर्वी होत्या.

 *'विषाणू' हा माणसासाठी हानिकारक अतिसूक्ष्मजीव, अनुकूल स्थिती व पोषण उपलब्ध असल्यास, एका दिवसात २८०००० अब्ज जीव वाढवतो. आपण लोकसंख्या वाढली वाढली म्हणून ओरडा करतो. पण पृथ्वीवर  माणसांची संख्या वाढून वाढून किती झाली, तर सुमारे ७५० कोटी. आता समजुन जा, सूक्ष्मजीवांच्या संख्येचा व क्षमतेचा विचार केला तर आपण त्यांच्या खिजगणतीतही नाही. भले आपण स्वतःला सर्वश्रेष्ठ व शक्तीवान मानत असू! ७५० कोटींना ते कधीही पुसुन टाकू शकतात.* 

माणसाने सूक्ष्मातील शक्ती ओळखली व अण्वस्त्रे तयार केली. परंतु निसर्गाच्या भात्यातही अशी अस्त्रे आहेत याचे भान त्याला राहिले नाही.

*जगात रोज हजारो माणसांना एडसची लागण होते. कधीना कधी अशी संहारक क्षमता बाळगणारा,  पण हवा, पाणी किंवा डासांमार्फत प्रसार होणारा विषाणू येणार हे नक्की होते. हवेतून प्रसार होणारा या क्षमतेचा विषाणू कोरोनाच्या रूपात आला आहे, ही सर्वात चिंताजनक गोष्ट आहे. अजून पाण्यातून वा डासांतर्फे पसरणारा असा  विषाणू आलेला नाही हे नशीब आहे.*

 सर्दी, पडशाचे जिवाणू वातावरण व तापमानातील  छोट्या फरकाने नाश पावतात परंतु  सर्वात प्रतिकुलतेत जगू शकणाऱ्या जिवाणूंची कल्पनाही करणे कठीण आहे. *तीव्र सल्फ्युरिक आम्लात जगणारे, तीव्र किरणोत्सारात, भूकवचात खोलवर आत्यंतिक उष्णतेत लोह, सल्फर, मँगेनीज इ. खाऊन जगणारे, बर्फात किंवा उकळत्या पाण्यातही टिकणारे सूक्ष्मजीव आहेत. आतापर्यंत आढळलेला, पेनिसिल्व्हानिया विद्यापीठातील संशोधकांनी जागृतावस्थेत आणलेला सर्वात दीर्घजीवी सजीव हा ६०० मीटर खोलीवर मेक्सिकोतील मिठाच्या खाणीत आढळलेला, २५ कोटी वर्षे सुप्तावस्थेत राहिलेला जिवाणु आहे. खरे जैविक जग हे माणसाच्या निरिक्षणापलिकडचे आहे. पृथ्वी हा जसा 'जलग्रह' आहे तसाच तो 'सूक्ष्मजीवग्रह' आहे. खरे तर पृथ्वीवर आपण जगत आहोत कारण सूक्ष्मजीवांनी परवानगी दिली आहे.* 

गेल्या शतकात, सन १९३२  मधे अलेक्झांडर फ्लेमिंगने  'पेनिसिलीन' या प्रतिजैविक  औषधाचा शोध लावला. सूक्ष्मजीव, जंतांमुळे मानवाला होणाऱ्या व्याधींपासुन मुक्तता मिळत गेली. "देवीचा रोगी दाखवा आणि शंभर रूपये मिळवा", अशा जाहिराती ५० वर्षांपूर्वी लावल्या जात  होत्या. अनेक रोगांना जगातुन हद्दपार केल्याची द्वाही मिरवली गेली. मात्र गेल्या चार दशकांत विषाणूंनी होणाऱ्या भयंकर नव्या रोगांनी आक्रमण केले आणि ज्यांना आपण संपवले या भ्रमात होतो ते रोगही पुनरागमन करत आहेत. 

एडस, एबोला, मारबर्ग, लासा, लेप्टोस्पायरोसिस, सार्स, आणि आता 'कोरोना' अशी नव्या दमाची विषाणूंची फौज मानवजातीवर तुटून पडत आहे. अँन्थ्रॅक्ससारखे विषाणू तर अमेरिकन लष्करानेच तयार केले असा संशय आहे.
सन १९८१ मधे एडसचा पहिला रूग्ण मिळाला. हा विषाणू, मानवी पेशीसारखा असल्याने तो नष्ट करण्याच्या प्रयत्नात मानवी पेशी नष्ट होतात, ही समस्या आहे. वैद्यकीय विज्ञानाचा रोगमुक्तीचा दावा का फोल ठरत आहे, याकडे दुर्लक्ष होत आहे. हे एक प्रकारे, रोगाचे मूळ कारण न शोधता लक्षणांवर उपाय करणे आहे. हे नवे विषाणू का निर्माण होत आहेत व वेगाने पसरत आहेत हे पाहू.
१     नैसर्गिक जनुकीय बदल : असा बदल उत्क्रांतीने हळुहळू किंवा अचानक होऊ शकतो.

२    दीर्घकाळ सुप्तावस्थेत राहिलेला विषाणू, परिस्थिती बदलल्याने प्रगट होणे किंवा क्रियाशील बनणे. सध्या तापमानवाढीमुळे लाखो वा कोट्यावधी वर्षे न वितळलेला बर्फ, वितळत आहे. त्याखाली दडलेले मृत जीव अतिशीत स्थितीत तेव्हा होते, त्या स्वरूपात सापडतात. पण लाखो वा कोट्यावधी वर्षे सुप्तावस्थेत जिवंत राहिलेले नैसर्गिक जिवाणू व विषाणूदेखील  आता बर्फ वितळल्याने मुक्त होत आहेत.

३     प्रयोगशाळेत बदल घडवून बनवलेला विषाणू. 

या विषाणूंच्या  मानवामधील प्रवेशास काही कारणे दिली जातात. जसे की, प्राण्यांशी अनैसर्गिक संभोग, पाण्यात मिसळलेल्या प्राण्यांच्या मलमूत्राचा रक्तात प्रवेश, रक्त वा स्त्रावाचा संपर्क, किंवा, आहारात, संसर्ग झालेल्या प्राणी, पक्षी, साप, इ. चे मांस येणे इ. पण या गोष्टी तर इतिहासात पूर्वीही झाल्या असणार. यातील नवे परिमाण समजुन घेणे आवश्यक आहे.

१९७० च्या सुमारास आफ्रिका खंडाचे दोन तुकडे करणारा शेकडो फूट रूंदीचा प्रचंड  दक्षिणोत्तर महामार्ग बांधण्यास सुरूवात झाली. जसजसा हा हायवे आफ्रिका खंडाच्या अंतर्भागात शिरू लागला, तसतशी आतापर्यंत लाखो, करोडो वर्षे, मानवापासुन अस्पर्श राहिलेल्या जंगलांची तोड सुरू झाली. महामार्गाच्या विस्ताराबरोबर जंगल कापण्याची अत्याधुनिक सामग्री वापरणारे, लाकडाच्या लोभाने आजूबाजूच्या जंगलांचा दूरवर नाश करत गेले. मध्य आफ्रिकेतील 'किन्शासा' प्रांतात, 'एबोला' नदीच्या  दुर्गम खोऱ्यात महामार्ग पोचला. या प्रक्रियेत लाखो वर्षांपासूनच्या, जीवजातींच्या परस्परांवर अवलंबुन असलेल्या अस्पर्श रचनेस आकस्मिक तीव्र धक्का बसला. अन्य जीवांमधे परोपजिवी स्वरूपात राहणाऱ्या विषाणूंची आश्रयस्थाने अचानक नष्ट झाली. तोपर्यंत हे विषाणू माणसासाठी अपरिचित होते. निरूपद्रवी होते. परंतु आता त्यांनी माणसात प्रवेश केला. एडसचा प्रसार या हायवेवरून होऊ लागला. हा हायवे "एडस हायवे" म्हणून ओळखला जातो.

*रिचर्ड प्रेस्टन या लेखकाचे 'हाॅट झोन' हे पुस्तक वाचावे. सत्यकथन करणारे हे पुस्तक वाचताना आपण  कादंबरी वाचत आहोत असे वाटते. मारबर्ग व संसर्ग झालेल्यांपैकी ९०% ना ठार करणाऱ्या एबोला विषाणूंच्या रूग्णांच्या शरीराची अवस्था, इंद्रिये विषाणूंनी थबथबणे, शरीराला छीद्रे पडणे, शरीर फुटणे, विषाणू पसरवणाऱ्या रक्ताची व द्रवांची कारंजी उडणे, सर्व शहारे आणणारे आहे. या अमानवी विकासाला विरोध होऊ नये म्हणून विषाणूंचा मानवातील प्रवेश व प्रसारांची कारणे मानवजातीला समजू दिली जात नाहीत.* 

डिएनए, आरएनए आणि प्रथिन अशी विषाणूंची घडण असते. या रचनेतील अतिसूक्ष्म बदलही नव्या स्वरूपात मानव व इतर प्राण्यांस भयंकर हानिकारक ठरू शकतो. विषाणूंमधील हा बदल मानवाने निर्माण केलेल्या आकस्मिक दबावामुळे घडत आहे. जहाल विषारी रसायने,
वायू, व किरणोत्सारी द्रव्यांचा खाड्या, नद्या, सागर, भूमी व वातावरणात सतत शिरकाव होत आहे. कोट्यावधी वर्षे समृद्ध जैविक विविधता बाळगणाऱ्या परिसंस्थांची गेल्या काही दशकांत अतिवेगाने मोडतोड झाली. हजारो चौरस किमी क्षेत्रफळाची जंगले दरवर्षी सपाट करण्यात आली,  जाळण्यात आली. नैसर्गिक रचना, हवामान यात मोठे बदल झाले. तापमान वाढत गेले. निसर्गास अपेक्षित नसलेल्या पध्दतीने मानवप्राणी जगू लागला.

औद्योगिकरण व अर्थव्यवस्थेची शिक्षणाने भलावण केली. ठोक राष्ट्रीय उत्पादनासारख्या ( जीडीपी) संकल्पनांनी अधिकाधिक वस्तुंचे उत्पादन हेच आपले उद्दिष्ट मानले. त्यावर अर्थशास्त्र आधारले आहे. जीडीपीचा दर वाढता ठेवणे म्हणजे विकास अशी कल्पना रूढ झाली. मागणी- पुरवठा, विनिमयाचे दर, चलनफुगवटा, निर्देशांकातील चढउतार, अशा गोष्टींनी मनाचा ताबा घेतला. जीडीपीची वाढ ही खऱ्या अर्थाने निर्मिती वा सृजन नसून विनाश आहे. परंतु अत्यंत छोट्या कालखंडातील केवळ विनिमयाच्या साधनाभोवती म्हणजे चलन- पैशांभोवती घोटाळणाऱ्या विचारांवर आधारलेल्या अर्थशास्त्राने, कोट्यावधी वर्षांच्या निसर्गाच्या प्रक्रियांकडे दुर्लक्ष केले.

*अनावश्‍यक वस्तुनिर्मितीच्या समर्थनासाठी आधुनिक बदलत्या जीवनशैलीची सबब पुढे केली जाते. परंतु जरी जीवनशैली बदलली तरी मानवी शरीर आणि निसर्गातील नाते ठरविणारे  अनेक ज्ञात, अज्ञात नियम व तत्वे बदलत नाहीत. जैविक घडामोडी तर रूढ अर्थशास्त्राच्या आवाक्यात कधीच नव्हत्या. त्याची जाणीवही शिक्षणात नव्हती.*

नवनव्या तंत्रज्ञानाबरोबर निसर्गाच्या शोषणाची चढाओढ सुरू झाली. लेप्टोस्पायरोसिससारख्या आजारांच्या  विषाणूंचे आणि खाड्या, खाजणे, नद्या, सागरांतील प्रदूषण व जीवसृष्टीचा समूळ नाश यांचे नक्की नाते आहे. *जहाल रसायनांना तोंड देण्यासाठी अतिसूक्ष्म जीवांना आपल्या शरीरात बदल करावा लागतो व त्यांचे बदललेले गुणधर्म इतर सजीवांना अपायकारक ठरतात.* मुंबईच्या गाभ्यात असलेल्या, भारतातील सर्वात प्रदूषित अशा  जलसाठ्याची, माहीमच्या खाडीची  परिस्थिती पहावी. म्हणजे विकासाचा  जीवसृष्टीच्या संदर्भातील अर्थ कळेल.  
शंभर वर्षांपूर्वी महाराष्ट्रात भयंकर संहार करणारा प्लेग, त्यावेळच्या सर्वाधिक शहरीकरण झालेल्या हाँगकाँगवरून आलेल्या बोटीतील बाधित उंदरांमुळे पसरला होता. मानव व त्याआधीचा त्याचा पूर्वज वानर लाखो  करोडो वर्षे जंगलात होते. हजारो वर्षे माणसे गावांत होती. छोटे समूह परस्परांपासून वेगळे होते. त्यामुळे जीवन शक्य झाले. विषाणू प्रसार व त्यामुळे एकाच वेळी होणाऱ्या उच्चाटनाचा धोका नव्हता. आता शहरे व पृथ्वीव्यापी पर्यटनामुळे तो आहे. 

अधिकाधिक वस्तुनिर्मिती, अधिकाधिक उपभोग, जीवनात इंद्रियसुखांना स्वैर प्रोत्साहन, अशी आनंदाची व्याख्या शारीर पातळीवर उतरते व खाणेपिणे, व्यसने, स्वैर संभोग, ही जीवनशैली बनते. यामुळे पाॅप गायक एल्व्हीस प्रिस्लेसारख्या ग्लॅमरच्या क्षेत्रातील अनेकांचे बळी एडसने घेतले. अनिर्बंध उपभोगवादासाठी विकासाच्या नावे निसर्गाच्या नाशाकडे कानाडोळा केला जातो. उदारीकरण, जागतिकीकरण, आर्थिक सुधारणा, अशा गोंडस कल्पनांच्या मुखवट्याआड  वास्तव दडवले जाते. याचे मूळ, अर्थशास्त्रीय कल्पनांत व घरात, कार्यालयांत, उद्योगांत  रस्त्यांवर जी विकास कल्पना प्रत्यक्षात येते, त्यात आहे. *ज्याप्रमाणे युद्ध मनांत जन्म घेते व रणांगणात फक्त लढले जाते त्याप्रमाणे वीजेवर चालणारा कटर जंगलात चालतो, पोकलेन यंत्र डोंगर तोडते, पण त्याचा उगम आपल्या मनातील विकास, प्रगती, प्रतिष्ठा, सुखावह जीवन, सोय याबाबतच्या शोषणवादी चुकीच्या भूमिकेत असतो.* 

आतापर्यंत एडससारखा अतिसंहारक विषाणू, रक्त वा वीर्यातून पसरत होता. पण अतिसंहारक क्षमता आणि हवा- पाण्यातुन प्रसार या दोन गोष्टी एकत्र आल्यावर, मानवाचा 'न भूतो न भविष्यति', असा संहार होणारच होता. ते पर्व आता सुरू झाले आहे.  *आधी सूक्ष्मजीव होते आपण नव्हतो.* त्यांच्यापैकी हरितद्रव्यरूपी सूक्ष्मजीवांनी अनुकूल स्थिती तयार केली व जगवले म्हणून आपण जगलो. तो जैविक विकास होता. परंतु आपण भौतिक विकासाचा कृतघ्नपणा करून त्यांच्या जीवावर उठलो. विकासाच्या नावे झाडे, जंगल व नदी सागरातील हरितद्रव्य झपाट्याने नष्ट केले जात आहे. प्राणवायू कमी होत आहे व कार्बन डाय ऑक्साईड वाढत आहे. जैविक विविधता व पृथ्वीची जीवनाची धारणा करण्याची कोट्यावधी वर्षांत विकसित झालेली क्षमता नष्ट केली जात आहे. काळाचे चक्र वेगाने उलट फिरवले जात आहे. अजून पृथ्वी आपल्याला सांभाळून घेत आहे. म्हणून अन्न पिकत आहे, विषाणू आटोक्यात येत आहेत. पण जाणाऱ्या प्रत्येक वर्षाबरोबर आपण उच्चाटनाकडे धावत आहोत. 

भूतकाळात नेणाऱ्या कालयंत्राची कल्पना, कथा कादंबरीत मनोरंजक वाटते. पण प्रत्यक्षात ती तशी नाही. आपण कालयंत्रात शिरलो आहोत. आधुनिकतेने आपल्याला खूप दूर मागच्या काळात वेगाने नेले जात आहे, जेव्हा तापमानामुळे आताची जीवसृष्टी अस्तित्वात नव्हती पण विषाणू होते. काल परवाच कौतुकाने बातमी दिली गेली होती की, गतवर्षी महाराष्ट्रात २३ लाख नव्या मोटारींची निर्मिती झाली. कार्बन डाय आॅक्साईड वायूच्या वातावरणात होणाऱ्या ७५% उत्सर्जनास मोटारी जबाबदार आहेत आणि तापमानवाढीची ९०% जबाबदारी या वायूची आहे. *आपण मोटारींत नाही तर कालयंत्रात बसून  वेगाने कोट्यावधी वर्षे ओलांडत, पृथ्वीवरील, आपले अस्तित्व नसणाऱ्या सूक्ष्मजीवांच्या, जिवाणु, विषाणूंच्या कालखंडात जात आहोत.*

अमेरिकेत जाॅर्ज बुशच्या काळात सन १९८९ मधे दोन्ही सभागृहांत एकमताने  "जैविक अस्त्र दहशतवाद विरोधी कायदा - १९८९" संमत झाला. आंतरराष्ट्रीय कायदा विषयाचे प्राध्यापक डाॅ. फ्रान्सिस बाॅयल हे या कायद्याचे निर्माते आहेत. *डाॅ. बाॅयल यांच्या मते,    "सध्या धुमाकूळ घालणारा 'कोरोना विषाणू', हे जैविक युद्धातील आक्रमक अस्त्र आहे. हा प्रयोगशाळेत जनुकीय बदल घडवून, युध्दासाठी कार्यक्षमतावाढ करून तयार केलेला विषाणू आहे.  संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक आरोग्य संघटनेला हे माहित आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ही गंभीर स्वरूपाची जागतिक साथ म्हणून घोषित केली. अनेक देश व शहरांनी कोरोनामुळे आणिबाणी जाहीर केली आहे. वुहानच्या जैविक सुरक्षा पातळी ४ या प्रयोगशाळेतुन हा विषाणु सुटला आहे.* वुहानची ही प्रयोगशाळा जागतिक आरोग्य संघटनेने खास दर्जा दिलेली आहे. जगात अशा मोजक्याच प्रयोगशाळा आहेत. या संस्थेला काय घडत आहे याची पूर्ण जाणीव आहे." चीनने सुरवातीला हे लपवण्याचा प्रयत्न केला पण आता अतिशय जहाल उपाय योजले.  एका बातमीप्रमाणे चीनने माणसे पेरली व कॅनडातील 'विनिपेग' येथील  प्रयोगशाळेतुन तस्करी केली.  चिनी संशोधक जोडप्याने कॅनडाच्या प्रयोगशाळेतुन पळवून चीनमधील वुहान येथील प्रयोगशाळेत विषाणू नेला. तो तेथून सुटला. आता अडचणीत आणणारे सत्य झाकण्यासाठी, तो  मांसातुन पसरला असे सांगितले जात आहे. चीन्यांच्या बेबंद खाद्य संस्कृतीला दोष देणे ही दिशाभूल आहे. अमेरिकेतील अर्कान्सासचे  सिनेटर  'टाॅम काॅरन' यांनी हा, मांसाहार कारण असल्याचा प्रचार, फेटाळला आहे. 'लॅन्सेट' या वैज्ञानिक संस्थेनेही, सुरवातीच्या रूग्णांचा मांसाहाराशी संबंध नसल्याचे दाखवले आहे. 

आपण कुणाला 'शास्त्रज्ञ' म्हणतो याचा तातडीने फेरविचार करण्याची गरज आहे. कारण 'शास्त्रज्ञ' या शब्दाला ब्रूनो, कोपर्निकस व गॅलिलिओंच्या परंपरेची पुण्याई जोडली जाते. हे धोकादायक आहे. डॉ. नो हे काल्पनिक खलनायक शास्त्रज्ञ पात्र. पण आज शिक्षणपद्धती खरेच असे करोडो 'डॉ. नो' तयार करत आहे, ज्यांना तुकड्यात घेतलेल्या शिक्षणामुळे जीवनाची समग्रता माहीत नाही.

 विज्ञानाची बैठक प्रमाणिकरण, तुकड्याच्या अभ्यासातुन संपुर्णाबाबत निर्णय घेणे, निसर्गाला वापरणे शोषणे यावर आधारली गेली. यामुळे पृथ्वी या जिवंत ग्रहावर अनर्थ घडला. सत्याचा शोध, शोषणमुक्ती हे विज्ञान होते. परंतु स्वयंचलित यंत्र आल्यावर याविरुद्ध जाणारे तंत्रज्ञान विज्ञानाचा मुखवटा घालून वावरू लागले. हा फरक न ओळखल्याने अर्थव्यवस्थेकडून सूत्रे हलणाऱ्या या जगात कल्पनेपेक्षा अदभूत अशा भीषण  सत्याची अनुभूती येत आहे. या प्रयोग करणाऱ्या तथाकथित शास्त्रज्ञांना आवरण्याची व ते प्रयोग बंद करण्याची गरज आहे.

मुळात 'युद्ध' हीच चुकीची गोष्ट आहे. त्यात विषाणूंच्या संदर्भात ती स्वतंत्र कृति असू शकत नाही. तिचा मानवजात व जीवसृष्टीवर परिणाम होणार. विषाणूंचा युद्धात वापर करणारांच्या बुध्दीचे आश्चर्य वाटते. ते वापरणारांवर किंवा सर्व मानवजातीवर उलटू शकतात याचे भान त्यांना नाही ? अशी संशोधने चालूच कशी शकतात ? अर्थात शेतीत रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर करणारे, जिवाणु गांडुळांचा  आणि कॅन्सरने मरणारांचा विचार कुठे करतात ? ही सार्वत्रिक असंवेदनशीलता आहे.  स्वयंचलित यंत्रे व रोबोंनी निर्जिव ग्रहावर औद्योगिकरण करणे ही कल्पना म्हणून ठीक. माणुस नावाच्या सजीवाने ते पृथ्वी या जिवंत ग्रहावर करायचे नव्हते.

या प्रश्नांबाबतचे आधुनिक जगाचे आकलन चुकले आहे. कारण यांना, 'आधुनिक जग' हीच चूक आहे हे मान्यच करायचे नाही. चीन दरवर्षी १ कोटी लोकांना दारिद्रय़रेषेखालून वर उचलण्याचा कार्यक्रम राबवत आहे. म्हणजे काय तर औद्योगिक विकासाला चालना देणे, अधिक नोकऱ्या उपलब्ध करणे, सर्व ग्रामीण जनतेला सीमेंटच्या घरांत टाकणे. आता चीनी अधिकारी प्रौढीने म्हणतात की, "कोरोना विषाणू आमच्या दारिद्रय निर्मूलनाच्या कार्यक्रमात खीळ घालू शकणार नाही". सुमारे साठ वर्षांपूर्वी शेती उत्पादन वाढवण्यासाठी चिमण्या व इतर पक्ष्यांना नामशेष करण्याचा मूर्खपणा या देशाने केला. त्यापायी जैविक साखळी तुटून दुष्काळ पडला व दोन - चार कोटी माणसे भूकेने मेली. आताही ज्यामुळे विषाणू व तापमानवाढ होत आहे, तेच  औद्योगिकरण व शहरीकरण ते पुढे रेटत आहेत. तेदेखील अंत जवळ आला असताना. 

तापमान मर्यादेबाहेर जात असल्याने उष्माघातापासुन वाचण्यासाठी वरचेवर पाणी पिणे, कडक ऊन टाळणे अशा गोष्टी सुचवल्या जातात. हे उष्माघातापासुन वाचण्याचे उपाय आहेत. तापमानवाढीवरचे उपाय नाहीत. तसेच हात धुणे, अंतर राखणे, विशिष्ट मास्क घालणे हे संसर्ग होऊनये म्हणून उपाय आहेत. तो विषाणूंवरचा उपाय नाही. जो उपाय आहे त्यावर बोलले जात नाही. प्रगती व सुखसोयींच्या नावाने चालू असलेला भौतिक विकास व पृथ्वी व जीवसृष्टीवर जीवनविरोधी जीवनशैली थांबवणे हाच फक्त उपाय आहे. ज्याप्रमाणे प्रदूषणरहित मोटार हे मिथक आहे त्याप्रमाणे शाश्वत भौतिक विकास हे मिथक आहे. स्वयंचलित यंत्र व वीजेने केलेला भौतिक  विकास शाश्वत असू शकत नाही. निसर्गाच्या खऱ्या जगाच्या  दृष्टीने आताचे कृत्रिम जग हे शाश्वत असणे असंभव आहे. कोरोनासारखे विषाणू मानवजातीला पृथ्वीवरून पुसुन टाकू शकतात. यात अतिशयोक्ती नाही. आता क्वारंटाईनमधे ठेवून विलगीकरण केले जाते परंतु खरे रक्षण करणारे विलगीकरण म्हणजे कृषियुगातील छोट्या खेड्यांच्या हजारो वर्षे टिकलेल्या कालखंडात परत जाणे. ते लवकर केले नाही तर अॅमेझाॅनच्या किंवा आफ्रिकेतील काँगोच्या खोऱ्यातील जंगलात नग्नावस्थेत, कपड्यांचाही संबंध नाही इतके तुटक, विलग जीवन जगणारी माणसेच वाचू शकतील. तीदेखील तापमानवाढ त्यांचे उच्चाटन घडवत नाही तोपर्यंतच म्हणजे फक्त पुढील तीस - पस्तिस वर्षे. 

*निसर्गाविरूध्द पुकारलेल्या युद्धात अहंकारी मूढ मानवाचा पराभव होणार हे निश्चित होते. तो झाला आहे. आता जीव वाचवा. पृथ्वीला, निसर्गाला शरण जा. पण त्याचा अहंकार, भोगलोलुपता व मूर्खपणा एवढा आहे की ते त्याला समजत नाही किंवा मान्य करायचे नाही.*

लेखक
अॅड. गिरीश राऊत

भारतीय जीवन व पृथ्वीरक्षण चळवळ

Wednesday, February 19, 2020


"प्रौढ प्रताप पुरंदर"
"महापराक्रमी रणधुरंदर" "क्षत्रियकुलावतंस्"
"सिंहासनाधीश्वर"
"महाराजाधिराज" "महाराज"

"श्रीमंत" "श्री छत्रपती" "शिवाजी" "महाराज" की "जय"

#सदैव_नतमस्तक
शतके बदलली एवढ्या प्रदिर्घ काळात..
 आकाशातला सुर्य रोज उगवला आणि झाकोळला..
परंतु रयतेच्या मनावर राज्य करणारा
 छञपती शिवरायांचा कर्तृत्वाचा, तेजाचा,
  प्रेरणेचा प्रकाश हा कायस्वरूपी आजही रयतेच्या,  जनतेच्या इथल्या मनावर अधिराज्य गाजवत राहीला
तो कधीच न मावळण्यासाठी.. अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान
शिवराय असे शक्तिदाता
शिवजन्मोत्सवाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा!!!
या अठरा पगड जाती पून्हा 🤝🏻एकाच ध्येयाने एकत्र याव्या 🎯व तुमच्या रुपाने आम्हाला पुन्हा आमचा शिलेदार लाभावा. एवढीच तुम्हा चरणी प्रार्थना राजे

Friday, January 24, 2020

७१ वा भारतीय प्रजासत्ताक दिवस चिरायू होवो

भारत भूमी जिच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली अशा सर्व वीर पुत्रांना वंदन 

भारत विविधतेत एकता असणारा देश 

अनेक रंग अनेक सण उत्सव अनेक नृत्य  अनेक कला विविध भाषिक लोक कला   


भारत हमको जान से प्यारा है 


भारतीय संस्कृती 


*के.बी.एच.हायस्कूल, विरगाव नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी

*के.बी.एच.हायस्कूल, विरगाव ता.बागलाण जि. नाशिक* 

■■■■■■■■◆◆◆◆◆◆◆■■■■■■■
                  
*नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती*

          *विद्यालयात आज दि.२३ जानेवारी २०२० रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.आर.डी.भामरे  होते त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित मार्गदर्शन केले त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे व आपल्याही हातून चांगले देश कार्य घडो अश्या अपेक्षा व्यक्त केल्या ...!!*

           *यावेळी विद्यालयाचे  मुख्याध्यापक श्री.आर.डी.भामरे,पर्यवेक्षक  श्री.एच.झेड.भामरे , शिक्षक वृंद ,शिक्षकेतर कर्मचारी व  विद्यार्थी उपस्थित होते*.
           *कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इ.९ वी-अ च्या विद्यार्थ्यांनी केले.*
◆◆◆◆◆◆◆●●●●●●●◆◆◆◆◆◆◆◆

स्पर्धा परीक्षेत यश कुमार - खंडाळे निखील इ.१० वी

*के.बी.एच.हायस्कूल, विरगाव ता.बागलाण 

जि. नाशिक*

■■■■■■■■◆◆◆◆◆◆◆■■■■■■■■


          *के.बी.एच.हायस्कूल विरगाव येथील कु.खंडाळे निखिल इ.१० वी या विद्यार्थ्यांने  गांधी रिसर्च फाउंडेशन तर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत नाशिक जिल्ह्यात तिसरा क्रमांक मिळाल्याबद्दल विद्यालय परिवारातर्फे त्याचे पुष्प ...🌹🌹🌹देऊन सत्कार करण्यात आला यावेळी विद्यालयाचे  मुख्याध्यापक श्री.आर.डी.भामरे,पर्यवेक्षक  श्री.एच.झेड.भामरे व शिक्षक वृंद ,विद्यार्थी उपस्थित होते*.


◆◆◆◆◆◆◆●●●●●●●◆◆◆◆◆◆◆◆

Sunday, January 12, 2020

राजमाता जिजाऊ व भारतीय तत्त्वज्ञानी स्वामी विवेकानंद जयंती

 "जिजाऊ" शब्द किंवा नावाचा ध्वनी नसून उतुंग आदर्श मातृत्वाचा निरंतर वाहणारा  निर्झर आहे. या गौरवशाली मातृत्वाच्या अत्युच्च शिखराला जगात तोड नाही. आदर्श ममतेचा,संस्काराचा,शौर्याचा,धैर्याचा, स्वराज्याचा ज्वलंत साक्षात्कार म्हणजे मा जिजाऊ...
  
१२ जानेवारी १५९८ हा दिवस स्वराज्याची नवी पहाट घेवुन उगवला,वैभवशाली यादव कुळातील लखुजी जाधवांच्या घरी म्हाळसाराणीच्या पोटी एका दैदिप्यमान कन्येने सिंधखेडराजा येथे जन्म घेतला. कन्याप्राप्तीचे स्वप्न साकार होण्याच्या या घटनेने आनंदित होवून राजे लखुजी जाधवांनी हत्तीवरुन साखर वाटली. राजघराण्यातील या कन्येला राजकारण,घोडस्वारी,तलवारबाजी,मुसद्देगीरी,युद्धकलेचे धडे घरातुनच गिरवता आले.१६१०  मध्ये शहाजी सोबत जिजाऊंचा विवाह झाला ही स्वराज्य स्थापनेतील महत्वाची घटना.